सप्टेंबरमध्ये कशी असेल मान्सून स्थिती? हवामान खात्याकडून मोठी अपडेट

Monsoon in Maharashtra: ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन्ही महिन्यात मिळून सरासरीपेक्षा अधिक पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण ऑगस्ट महिन्यात अनेक ठिकाणी मान्सूननं निराशा केली आहे. यानंतर सप्टेंबरमधील मान्सून स्थितीबाबत हवामान खात्यानं मोठी अपडेट दिली आहे.

मुंबई, 01 ऑगस्ट: राज्यात मान्सूनचं  (Monsoon in Maharashtra) आगमन झाल्यानंतर यावर्षी राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होईल, अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली होती.

सुरुवातील दिमाखात आगमन केल्यानंतर राज्यात मान्सूननं निराशा केली आहे. अनेक जिल्ह्यांत अद्याप अपेक्षित पाऊस कोसळला नाही. मागील जवळपास दीड महिन्यांपासून राज्यात ऊन पावसाचा खेळ सुरू आहे.

दरम्यान कोल्हापूर सांगलीसह कोकणात अतिवृष्टी होऊन पूरस्थिती निर्माण केली. त्यामुळे याचा कोकणाला अधिक फटका बसला आहे. दुसरीकडे विदर्भ, खानदेश, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अपेक्षित पाऊस कोसळला नाही.

दरम्यान गेल्या महिन्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन्ही महिन्यात मिळून सरासरीपेक्षा अधिक पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता.

पण ऑगस्ट महिन्यात अनेक ठिकाणी मान्सूननं निराशा केली आहे. पण सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रासह संपूर्ण देशात सरासरी पेक्षा अधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पुढील तीन चार दिवसांत राज्यात मान्सून दिमाखात आगमन करेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हेही वाचा-

पुढील चार ते पाच दिवसात बंगालच्या उपसागरात कमी हवेच्या दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय होईल, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

राज्यात सप्टेंबर महिन्यात अनेक ठिकाणी मान्सूनची जोरदार हजेरी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा चांगला फायदा होणार आहे.

दुसरीकडे, आज नंदुरबार, धुळे, ठाणे, रायगड, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर या अकरा जिल्ह्यांना हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

तर पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. संबंधित बारा जिल्ह्यांत आज अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

मागील दोन दिवसांपासून पालघरमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. आजही याठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

तर पुणे आणि मुंबईत अंशत: ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली असून तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. .

Related Posts

Ramchandra Sabale Havaman Andaj 48 hoursjpg

Weather Alert: येत्या 48 तासात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज

ramchandra sabale havaman andaj

Weather Update: राज्यात पुढील चार दिवस पावसाचा जोर कायम डाॅ रामचंद्र साबळे हवामान अंदाज महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

X