Weather Update: गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या अनेक भागांमध्ये प्रचंड पाऊस झाला आहे. त्यामुळे अनेकठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले होते. तसेच शेतीचेही मोठे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर आगामी काही दिवस राज्यासाठी महत्त्वाचे असल्याचे मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याकडून पुणे जिल्ह्यात येत्या दोन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
आजचे हवामान अंदाज 2021 live
गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जिल्ह्यात विश्रांती घेतली आहे. मात्र, आगामी दोन दिवसांत घाटमाथ्याच्या परिसरात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस कोसळू शकतो. तर मध्य महराष्ट्रा, कोकण ,गोवा ,मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा वेधशाळेकडून देण्यात आला आहे.
राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज
राज्यात पुढील तीन दिवस मध्य महाराष्ट्राच्या परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. बंगालच्या उपसागरापासून तमिळनाडूच्या किनारपट्टीपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले.
शुक्रवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये कोकणात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. कोकण आणि मराठवाड्यात पुढील दोन ते तीन दिवस तुरळक ठिकाणी जोरदार, तर बहुतांश भागात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. तर विदर्भात काही ठिकाणी पावसाचा जोर राहील, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.
उजनीतील पाणीसाठा वाढला
गेल्या 48 तासात उजनी धरणात सुमारे दोन टीएमसी पाणी आल्याने धरणातील पाणी साठा तीन टक्क्याने वाढून 95.39 टक्क्यांवर आला आहे. उजनी धरणाने 95 टक्क्यांची पातळी ओलांडल्याने शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त केला जात आहे. उजनी धरणाची वाटचाल शंभरीकडे सुरू असल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.
मराठवाड्यात कुठे अलर्ट?
3 ऑक्टोबर- या दिवशी औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर
4 ऑक्टोबर – औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली, परभणी व उस्मानाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता, मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान सल्ला पत्रकात वर्तवण्यात आली आहे.
हे वाचलंत का?
- 🔴 Live Maharashtra Weather : 8 ते 13 डिसेंबरचा हवामान अंदाज… कुठं पाऊस तर कुठं थंडी, कसं असेल महाराष्ट्रातील हवामान, माणिकराव खुळे लाईव्ह हवामान अंदाज
- IMD Alert Today हवामान खात्याचा इशारा…5 डिसेंबरपर्यंत या भागात होणार मुसळधार पाऊस
- Maharashtra Weather Update | हवामान विभागाची मोठी अपडेट, ‘या’ भागांना गारपीटीचा इशारा पहा १ डिसेंबर चा हवामान अंदाज
- Havaman Andaj | कुठे होणार गारपीट आणि वादळी पाऊस? असा आहे राज्यातील हवामान अंदाज २८, २९, ३० नोव्हेंबर
- India Meteorological Department : पुढील ३-४ दिवस होणार मेघगर्जनेसह पाऊस तर या २५ जिल्ह्यांना यलो अलर्ट
06 ऑक्टोबरला परतीचा पाऊस
दरम्यान, हवामान विभागाने परतीच्या पावसाचा अंदाजदेखील व्यक्त केला आहे. मान्सूनचा परतीचा प्रवास 06 ऑक्टोबरला सुरु होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागाचे दिल्ली येथील तज्ज्ञ के. एस. होसळीकर यांनी ट्वीट करून याविषयी माहिती दिली. मान्सूनचा परतीचा प्रवास वायव्य भारताच्या काही भागांतून सुरु होईल.
अतिवृष्टीने मराठवाड्यात 2,254 कोटींचे नुकसान
गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात 25 लाख 98 हजार 213 हेक्टरचे नुकसान झाले आहे. हा आकडा 30 लाख हेक्टरपर्यंत जाऊ शकतो. महसूल प्रशासनाने तयार केलेल्या प्राथमिक अहवालात सुमारे 2254 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला आहे. तसेच याचा अंतिम अहवाल 3000 कोटी रुपयांचा असू शकतो. पहिल्या टप्प्यातील अहवाल मदत व पुनर्वसन विभागाकडे पाठवण्यात आला असल्याची माहिती महसूल उपायुक्त पराग सोमण यांनी गुरुवारी दिली होती.
नाशिकमध्ये 14 धरणे काठोकाठ भरली
गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या जोरदार हजेरीमुळे नाशिकमधली 14 धरणे काठोकाठ भरलीयत, तर जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीचा चेंडू सीमेपार गेलाय. जिल्ह्यात पावासने लावलेल्या दमदार हजेरीमुळे अनेक ठिकाणी हाहाकार उडालाय. मनमाड, नांदगाव या ठिकाणी दोनदोनदा पूर आला. नाशिकमध्ये गोदावरीला चार वेळा पूर आला. गंगापूर धरण समूह भरलाय. गंगापूर धरणातून सतत विसर्ग सुरू होता. तूर्तास तरी पावसाच्या या तडाखेबंद बॅटींगनं जिल्ह्याची तहान भागलीय. जिल्ह्यातल्या चौदा धरणांचा पाणीसाठा शंभर टक्क्यांवर गेलाय. त्यात गंगापूर, काश्यपी, गौतमी गोदावरी, आळंदी वाघाड, दारणा, भावली, वालदेवी, कडवा, हरणबारी, केळझर, नाग्यासाक्या, माणिकपुंज या धरणांचा समावेश आहे. तीसगाव, चणकापूर, पुनद ही धरणेही भरण्याच्या मार्गावर आहेत.
नाव | के.एस.होसाळीकर हवामान अंदाज |
---|---|
विभाग | प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई |
पत्ता | IMD Mumbai |
दिनांक | 3 ऑक्टोबर 2021 |
संकलन | आजचे हवामान महाराष्ट्र 2021 |
मित्रांनो दररोज जिल्हानिहाय हवामान अंदाज मिळवण्यासाठी आणि त्याचबरोबर पंजाब डख हवामान अंदाज व हवामान विभागाचे अपडेट निशुल्क मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा आणि हि माहिती जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद