येत्या पाच दिवसांत कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्येही जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय झाल्यानंतर अनेक जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढले आहे. मुंबईतही १० ऑगस्टपर्यंत सतर्कतेचा इशारा दिला आहे. या कालावधीत मुंबईसह राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि पालघरच्या काही भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
हेही वाचा – Government scheme : ग्रामसमृद्धी योजना गाय गोठा या योजनेसाठी मिळणारे तब्बल 1 लाख रुपये
पुढच्या तीन ते चार तासांत मुंबई, ठाणे आणि पालघरच्या जिल्ह्यातील काही ठिकाणी ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाच्या मुंबई कार्यालयाकडून देण्यात आली आहे. तसेच समुद्र किनाऱ्यावरही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, येत्या पाच दिवसांत कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्येही जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच नदी काठच्या गावांना सावध राहण्याचा इशाराही हवामान विभागाच्यावतीने देण्यात आला आहे.
- Monsoon Update : ‘या’ तारखेला होणार राज्यात मान्सून दाखल! पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज
- Monsoon Update: यंदा मान्सूनची जोरदार बॅटिंग, धो-धो बरसणार, पण जूनमध्ये…; IMD चा हवामान अंदाज
- Monsoon Updates: IMD ने मान्सूनबाबत दिली गुड न्यूज, एल निनोचा धोका असतानाही असा बरसणार पाऊस
- Monsoon Update : सध्या मान्सून कुठे आला, राज्यात मान्सून कधी येणार?, काय आहे IMD चा अंदाज
- या तारखेला येणार राज्यात मान्सून, राज्यात हवामानाबाबत पंजाबराव डख यांचे मोठे संकेत ! monsoon update