अखेर नैऋत्य मान्सून कोकणात दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागानं याबाबतची माहिती दिली आहे.
Monsoon arrives : सर्वांसाठीच एक आनंदाची बातमी समोर आली आहे. अखेर आज (10 जून) नैऋत्य मान्सून कोकणात दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागानं याबाबतची माहिती दिली आहे. सर्वांनाच मान्सूनचे वेध लागले होते. अखेर मान्सूनची प्रतिक्षा संपली असून नैऋत्य मान्सून कोकणात दाखल झाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, मागच्या वर्षी मान्सून 7 जूनला तळकोकणात दाखल झाला होता. तर यावर्षी महाराष्ट्रात यायला मान्सूनला तीन दिवस उशीर झाला आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढच्या 24 तासांत मान्सून कोकणात दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. भारतीय विभागानं सांगितलेल्या अंदाजानुसार मान्सून अखेर कोकणात दाखल झाला आहे. कोकणात मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली होती. कर्नाटकमध्ये अडकलेली मान्सूनची गाडी पुढे सरकारली आणि आज अखेर मान्सून कोकणात दाखल झाला आहे. नैऋत्य मान्सून मध्य अरबी समुद्राच्या काही भागात, तसेच संपूर्ण गोवा, कोकणचा काही भाग आणि कर्नाटकच्या काही भागात दाखल झाला आहे.
शेतकऱ्यांना दिलासा
अनुक्रमणिका
Toggleहे पण वाचा
राज्यात मान्सून दाखल झाला ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. कारण शेतकरी खरीपाच्या पेरणीसाठी मान्सूनची वाट बघत होते. अखेर मान्सून दाखल झाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. गुरुवारी हवामान विभागानं पुढच्या 48 तासात मान्सून कोकणात दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. कारण कोकणात मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली होती. कर्नाटकमध्ये अडकलेली मान्सूनची गाडी अखेर रुळावर आली असून मान्सून आज कोकणात दाखल झाला आहे.
मुंबईसह उपनगरात पाऊस
आज मान्सून कोकणात दाखल झाला आहे. पुढच्या चार ते पाच दिवसात मान्सून महाराष्ट्राच्या अन्य भागात पोहोचण्याची शक्यता आहे. पुढील 48 तासात मान्सूनचे नैऋत्य वारे पुढे सरकरतील असे सांगण्यात आले आहे. दरम्यान मुंबईत दक्षिण मुंबई, मध्य मुंबईसह अनेक भागांत पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. तर ठाणे, गोरेगाव, कल्याणमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली. गेल्या अनेक दिवसांपासून उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना मान्सूनपूर्व सरींमुळं काहीसा दिलासा मिळाला आहे. भिवंडी शहरासह ग्रामीण भागामध्ये काल अचानक वादळी वाऱ्यासह रिमझिम पावसाला सुरुवात झाली. पाऊस सुरू झाल्याने परिसरात गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तर वादळी वाऱ्यामुळे शहरात तीन ठिकाणी झाडे कोसळल्याची घटना घडली आहे.
हे पण वाचा:
- Monsoon arrival : खुशखबर! अखेर मान्सून केरळमध्ये दाखल, हवामान विभागाची माहिती
- पंजाब डख नवीन हवामान अंदाज – राज्यात या तारखेपासून पावसाची हजेरी । Panjab Dakh Weather Alert
- Mansoon 2022: मोठी बातमी! मान्सूनची तारीख बदलली; आता ‘या’ दिवशी होणार आगमन । आजचा हवामानाचा अंदाज
- Monsoon 2022: हवामान विभागाचा अंदाज चुकणार? मान्सूनचा खोळंबा; पावसाला विलंब
- आला रे मान्सून आला… ‘या’ तारखेला महाराष्ट्रात दाखल होणार मान्सून! । Maharashtra monsoon weather
नाव | हवामान अंदाज महाराष्ट्र राज्य |
---|---|
विभाग | भारतीय हवामान शास्त्र विभाग |
पत्ता | हवामान विभाग – IMD |
दिनांक | 10 जून 2022 |
संकलन | आजचे हवामान महाराष्ट्र 2022 |
पंजाब डख हवामान अंदाज Whatsapp Group
मित्रांनो दररोज जिल्हानिहाय हवामान अंदाज मिळवण्यासाठी आणि त्याचबरोबर पंजाब डख हवामान अंदाज व हवामान विभागाचे अपडेट निशुल्क मिळवण्यासाठी इथे क्लिक करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा आणि हि माहिती जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद