नमस्कार वाऱ्याचा वेग मंदावला असून उन्हाचा चटका वाढला आहे. तर राज्यात यावेळी तुरळक भागात पोषक वातावरण तयार होणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात येत आहे. जाणून घेऊया याविषयी सविस्तर बातमी.
सध्या राजस्थान पासून मध्यप्रदेश, झारखंड व पश्चिम बंगाल बंगालच्या उपसागरात मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. व पश्चिम बंगालच्या परिसरात चक्रीय वाऱ्यांची स्थिती असून मध्यप्रदेशच्या भागात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे.
या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी होणार असल्यामुळे राज्यातील वाऱ्याचे वेग कमी होण्याचे शक्यता आहे. यामुळे राज्यात तुरळक ठिकाणी स्थानिक ढगांच्या निर्मितीसाठी पोषक वातावरण तयार होत आहे.
तर राज्यातील काही भागात दुपारनंतर स्थानिक ढगांची निर्मिती होऊन काही िकाणी पावसाची शक्यता आहे. तर विदर्भातील सर्व जिल्ह्यासह मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात दुपारनंतर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होईल.
हे पण वाचा
- पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज : ‘या’ तारखेपासून थंडीची तीव्रता वाढणार, 15 डिसेंबर नंतर पुन्हा पावसाची शक्यता!
- पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज ! ‘या’ भागात पावसाची शक्यता, तुमच्याकडे कसे राहणार हवामान? वाचा…
- NEW आजचे सोयाबिन बाजार भाव 26 सप्टेंबर 2024 Soyabin Bajar bhav
- राज्यात पुढील २ दिवस मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागांत धो-धो बरसणार, कसं असेल हवामान?
- Panjabrao Dakh Havaman Andaj | राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार; या जिल्ह्यांमध्ये जोरदार बरसणार
तर कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात हलक्या सरी ची शक्यता आहे. मित्रांनो अशीच माहिती मिळवण्या साठी आपल्या वेबसाईटचे नोटिफिकेशन सुरु करा. व हा हवामानाचा अंदाज इतर मंडळींना शेयर करा.