Rain Alert by panjab dakh : मान्सूनबाबत मोठी बातमी समोर येत आहे. येत्या आठ जूनला राज्यात मान्सून दाखल होईल असा अंदाज हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे. मान्सूनचा पाऊस पूर्वेकडून येणार असल्यामुळे तो वेळेत म्हणजे आठ जूनलाच राज्यात सक्रिय होईल. 12 ते 17 तारखेपर्यंत त्याची तीव्रता वाढेल तर वीस तारखेपर्यंत मान्सून राज्यभर सक्रिय होईल असा अंदाज डख यांनी व्यक्त केला आहे.
पंजाबराव डख यांचा अंदाज
आज पासून मान्सून पूर्व पावसाला सुरुवात होईल असेही त्यांनी सांगितलं. एल निनोच्या प्रभावामुळे मान्सून लांबणार असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामान विभाग व पंजाबराव डख यांच्या पावसाच्या अंदाजात पुन्हा एकदा विसंगती पाहायला मिळत आहे.
Punjab dakh Havaman Andaj
दरम्यान पंजाबराव डख यांनी पुन्हा एकदा हवामान विभागाच्या अंदाज व्यक्त करण्याच्या पद्धतीवर टीका केली आहे. मी शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टीने अभ्यास करतो, त्यामुळे मला पावसाचे ढग दिसतात. इतरांना ते दिसत नाहीत अशी अप्रत्यक्ष टीका डख यांनी राज्य सरकारच्या हवामान विभागावर केली आहे. तसेच पावसाचा अचूक अंदाज बांधण्यासाठी सर्व हवामान संस्थानी एकत्रित अभ्यास करण्याची गरज असल्याचंही ते यावेळी म्हणालेत.
काय आहे हवामान विभागाचा अंदाज?
एल निनोच्या प्रभावामुळे मान्सून लांबणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाच्या या अंदाजामुळे बळीराजाची चिंता वाढली आहे. मात्र दुसरीकडे डख यांनी येत्या आठ जूनलाच राज्यात मान्सून सक्रिय होईल असं म्हटलं आहे. डख यांचा हा अंदाज खरा ठरल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला मिळणार आहे.
हे पण वाचा –
- राज्यात सूर्य तापला, या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी, पहा आजचे हवामान कसे असेल | Havaman Andaj Today
- यंदा महाराष्ट्रात किती पाऊस पडेल? मान्सूनसाठीचा पहिला अंदाज जाहीर
- Havaman Andaj Today: राज्यात पावसाचे आगमन; काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, गारपीट व वादळी वाऱ्याचा इशारा
- Rain Alert: महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस आणि गारपिटीचे संकट; ऑरेंज अलर्ट जारी
- आजचे हवामान अपडेट: महाराष्ट्रात तापमानाचा कहर! 37 अंशांच्या पार, नागरिक त्रस्त