Monsoon 2023 : 5 जुलै हवामान अंदाज येत्या 48 तासात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता; IMD कडून 'यलो अलर्ट' - हवामान अंदाज महाराष्ट्र 2023 - शेतकरी सेवार्थ.!
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग
. .
. .
Trending Now

Monsoon 2023 : 5 जुलै हवामान अंदाज येत्या 48 तासात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता; IMD कडून ‘यलो अलर्ट’

Maharashtra Rain News : मुंबई, महाराष्ट्रासह सध्या देशाच्या बहुतांश भागांमध्ये पावसानं दमदार हजेरी लावल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यातील विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पाऊस चांगलाच बरसताना दिसत आहे.

मंगळवारी मुंबई आणि नजीकच्या किनारपट्टी भागातून काही ठिकाणी पावसाचा जोर कमी झाला तरीही हलक्या सरींनी शहराला ओलंचिंब केल्याचं पाहायला मिळालं. पुढील 48 तासांचा आढावा घ्यायचा झाल्यास, आयएमडीच्या वृत्तानुसार येणारे दोन दिवसही पावसाचेच असणार आहेत. 

आज पाऊस पडणार आहे का ?

पुणे वेधशाळेचे महासंचालक के.एस. होसाळीकर यांनी ट्विट करत दिलेल्या माहितीनुसार 5 आणि 6 जुलै दरम्यान राज्याच्या पश्चिम किनारपट्टी भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 6 जुलैपर्यंत मान्सूनची तीव्रता वाढणार असून हा तीव्र कमी दाबाचा पट्टा कोकणाच्या उत्तर दिशेने सरकणार आहे. तर, महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांमध्ये मध्यम स्वरुपाच्या पर्जन्यमानाचा अंदाज आहे. 

मुसळधार पावसानं वाहतुकीची तारांबळ 

राज्यात सुरु असणाऱ्या पावसामुळं वाहतुकीवरही याचे थेट परिणाम होताना दिसत आहेत. तिथं मुंबई- गोवा महामार्गावर आणि काही घाटमाथ्यावरील वळणवाटांच्या रस्त्यांमध्ये दरडी कोसळण्याचा धोका वाढत असल्यामुळं नागरिकांना सत्रकतेचा इशारा देण्यात आला आहे. तर, मुसळधार पावसामुळं मुंबई लोकल रेल्वे वाहतुकीवरही थेट परिणाम दिसून येत आहेत. 

दरम्यान, या पावसामुळं मान्सूनदरम्यानच्या पर्यटनाला चालना मिळताना दिसत आहे. पालघर, कर्जत, कोकण, अलिबागच्या दिशेनं येणाऱ्यांचा आकडा दिवसागणिक वाढतानाच दिसत आहे. 

राज्याच्या कोणत्या भागाकडे पावसानं फिरवली पाठ? 

महाराष्ट्रात काहीशा धीम्या गतीनं आलेला मान्सून अद्यापही राज्याच्या काही भागांमध्ये पूर्णपणे सक्रिय झालेला नसल्यामुळं या भागांमध्ये शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावलं आहे. इथं पाऊस आला खरा, पण तो फार काळ टीकलाच नाही.

उद्या पाऊस आहे का ?

ऐन मोसमातच पावसानं दडी मारल्यामुळं आता वर्ध्यातील बळीराजा हतबल झाला आहे. तिथं वाशिममधयेही परिस्थिती वेगळी नाही. वाशिम जिल्ह्यात आतापर्यंत 30 टक्के पेरण्या झाल्या आहेत. 4 दिवसांपासून पावसाने दडी मारल्यानं पिकं धोक्यात आली होती. पण, पुन्हा पावसाची चिन्ह दिसली आणि शेतकऱ्याला दिलासा मिळाला. 

आजचा हवामानाचा अंदाज

नावहवामान अंदाज महाराष्ट्र राज्य
विभागभारतीय हवामान शास्त्र विभाग
पत्ताहवामान विभाग – IMD
दिनांक5 जुलै 2023
संकलनआजचे हवामान महाराष्ट्र 2023

पंजाब डख हवामान अंदाज Whatsapp Group

मित्रांनो दररोज जिल्हानिहाय हवामान अंदाज मिळवण्यासाठी आणि त्याचबरोबर पंजाब डख हवामान अंदाज व हवामान विभागाचे अपडेट निशुल्क मिळवण्यासाठी खालील कोपऱ्यात येणाऱ्या बटनावर क्लिक करा.

शेअर नक्की करा:
Close Visit Havaman Andaj