Maharashtra Rain Forecast: गेल्या आठवड्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली. आता पुढील तीन दिवसांत राज्यातील कुठल्या भागात जोरदार पाऊस पडणार पाहूयात याबाबतचा अंदाज
29 जुलै : महाराष्ट्रात गेल्या आठवड्यात विविध ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy rainfall) पूरस्थिती निर्माण झाली. या महापुरात अनेकांनी आपले जीव गमावले तर अनेकांनी आपले घर गमावले. या महापुरानंतर आता राज्यातील पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याचं दिसत आहे. मात्र, पुढील तीन-चार दिवसांत राज्यातील काही भागांत जोरदार पाऊस (Rain) बरसण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पाहूयात हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार कशी असेल पावसाची स्थिती.
पुढील तीन तासांत पावसाचा अंदाज
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील तीन तासांत राज्यातील ठाणे, रायगड, पुणे जिल्ह्यांतील काही भागांत मध्यम स्वरूपाचा ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.
पुढील हवामानाचा अंदाज
29 जुलै
कोकण – बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. महाराष्ट्रातील किनारपट्टीच्या भागात सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र – बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मराठवाडा – तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विदर्भ – बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
30 जुलै
कोकण – बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र किनारपट्टीच्या भागात सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र – बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मराठवाडा – तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विदर्भ – बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हे पण वाचा
31 जुलै

1 ऑगस्ट