weather forecast today

Weather Alert : महाराष्ट्रात इतके दिवस मुसळधार सुरुच राहणार, उत्तर कोकणाला ऑरेंज अलर्ट

Weather Forecast: प्रादेशिक हवामान विभाग, मुंबईच्यावतीनं हवामानाचा अंदाज जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचं हवामान विभागाच्या अधिकारी शुभांगी भुते यांनी सांगितलं आहे.

महाराष्ट्रात आज आणि उद्या सुद्धा पाऊस होईल. 24 व 25 तारखेला बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असल्यानं येत्या काही दिवसात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तर, पुढील पाच दिवसांसाठी हवामानाचा अंदाज जारी करण्यात आला आहे. तर, हवामान विभागानं आज रायगड, रत्नागिरी आणि पालघरला ऑरेंज अलर्ट दिला असून महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

हवामान विभागाकडून जारी करण्यात आलेले पावसाचे इशारे

पालघरमध्ये संततधार

पालघर जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसाची संततधार कायम असून पावसाने दमदार हजेरी लावल्याने धरणक्षेत्रात पाणी साठ्यात वाढ झाली आहे. पालघर ,  मनोर , बोईसर ,  डहाणू , तलासरी भागात ढगांच्या गडगडाटासह पाऊस सुरू आहे. दोन दिवस झालेल्या पावसाने सुर्या नदीवरील धामणी धरण 100 टक्के भरले असून धरणाचे 5 वक्रीदरवाजे 60 सेमी ने उघडण्यात आले आहे.

हे पण वाचा – पंजाब डंख हवामान अंदाज (पुढील इतके दिवस जोरदार)

तर धरणाखालोखाल असलेला कवडास उन्नती बंधारा ओव्हरफ्लो होऊन वाहत आहेत. यामुळे सुर्या नदीत 12 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून सुर्या नदीला पूर आला आहे. पावसाची संततधार कायम असून पावसामुळे भात पिकांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हाती आलेले भात पिकांना मुसळधार पावसाने पाण्यात खराब होणार असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.

वसई विरारमध्ये रिमझिम पाऊस

वसई विरार नालासोपारा मध्ये रिमझिम पावसासह अधूनमधून जोरदार पावसाने हजेरी लावायला सुरुवात केली आहे. परिसरामध्ये पूर्णपणे काळेकुट्ट आभाळ झाले असून वातावरण ढगाळ झाले आहे. आज दिवसभर जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सध्या शहरातील सखल भागात कुठेही पाणी साचलेले नाही.

महाराष्ट्रात मान्सूनचा जोर कायम

महाराष्ट्रात मान्सूनचा जोर कायम असल्याचं स्कायमेटचे महेश पुलावत यांनी सांगितलं आहे. त्यामुळे 23 सप्टेंबरपर्यंत मान्सूनचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. याशिवाय विदर्भातही पावसाचा जोर वाढला असून धरणांतील पाणी साठ्यात वाढ झाली असून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Source – TV9 Marathi

इतर बातम्या:

Related Posts

havaman andaj today live 48 hours

सावधान ! पुढील 48 तास महत्त्वाचे, वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, या जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा Weather Alert

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

x
X