पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या काही भागात पावसाने उसंत घेतली आहे. परंतु, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने त्याचे वादळात रुपांतर झाले आहे. त्यामुळे राज्यातील पुढील दोन ते तीन दिवस मध्यम ते मुसळधार पावसाची (heavy Rainfall) शक्यता वर्तविण्यात आली आहे.
याच दरम्यान पुणे शहर आणि जिल्ह्यातली पावसाचा जोर वाढेल,असा अंदाज हवामान विभाग (IMD Alert) वर्तविला आहे. तसेच विदर्भ, दक्षिण कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा सरी कोसळण्याची शक्यता आहे.
मागील दोन दिवसांपासून उघडीप घेणारा पाऊस आता पुन्हा एकदा सक्रीय होण्याची दाट शक्यता आहे. शनिवारी (ता.२०) पूर्व विदर्भातील जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार आहे.
पूर्व मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवरील कमी दाबाचे क्षेत्र झारखंड व छत्तीसगडकडे मार्गस्थ होऊत,तेथे जोरदार पाऊस पडेल.पुढील आठवड्याच्या शेवटी मॉन्सूनचा आसही मूळ जागेपासून उत्तरेकडे हिमालयाच्या पायथ्याकडे जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर राज्यात उघडीप होईल, अशी शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
– नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्याच्या पश्चिमेकडील सह्याद्रीतील घाटमाथ्यावर मध्यम ते मुसळधार पाऊस
अनुक्रमणिका
Toggleहे पण वाचा
– घोटी, इगतपुरी, लोणावळा, मुळशी, ताम्हिणी, महाबळेश्वर, जावळी, बावडा, राधानगरी परिसरात जोरदार पाऊस कायम
– मंगळवार (ता.२३) पासून पावसाचा जोर कमी असेल. मात्र या काळातही तुरळक ठिकाणी किरकोळ व हलक्या पावसाची शक्यता आहे.
आजचा हवामानाचा अंदाज
नाव | हवामान अंदाज महाराष्ट्र राज्य |
---|---|
विभाग | भारतीय हवामान शास्त्र विभाग |
पत्ता | हवामान विभाग – IMD |
दिनांक | 20 ऑगस्ट 2022 |
संकलन | आजचे हवामान महाराष्ट्र 2022 |
पंजाब डख हवामान अंदाज Whatsapp Group
मित्रांनो दररोज जिल्हानिहाय हवामान अंदाज मिळवण्यासाठी आणि त्याचबरोबर पंजाब डख हवामान अंदाज व हवामान विभागाचे अपडेट निशुल्क मिळवण्यासाठी इथे क्लिक करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा आणि हि माहिती जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद