Weather Forecast : पावसाचा जोर वाढणार, पुढच्या 4 दिवसात कोकण,पश्चिम महाराष्ट्रासह राज्यभर मुसळधार पावसाचा इशारा

पुढील 3 ते 4 दिवसात महाराष्ट्रात पावसाच्या प्रमाणात वाढ अपेक्षित असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्यावतीनं जारी करण्यात आला आहे. तर, पुढील चार ते पाच दिवसांसाठी विविध जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अ‌ॅलर्ट जारी करण्यात आले आहेत.

मुंबई: भारतीय हवामान विभागानं महाराष्ट्रात ठिकठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील काही तासात बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता असल्यानं मुसळधार पाऊस होऊ शकतो. तर, पुढील 3 ते 4 दिवसात महाराष्ट्रात पावसाच्या प्रमाणात वाढ अपेक्षित असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्यावतीनं जारी करण्यात आला आहे. तर, पुढील चार ते पाच दिवसांसाठी विविध जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अ‌ॅलर्ट जारी करण्यात आले आहेत.

रत्नागिरी, रायगड पुण्याला ऑरेंज अलर्ट

भारतीय हवामान विभागानं रत्नागिरी, पुणे, रायगड जिल्ह्यांना ऑरेंज अ‌ॅलर्ट दिला असून तिथं मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर, दुसरीकडे सातारा, ठाणे, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग, अमरावीत, बुलडाणा, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा गोंदिया जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या:

12 सप्टेंबरला पावसाची स्थिती कशी?

हवामान विभागानं रविवारी रायगड, रत्नागिरी, सातारा, पुणे, कोल्हापूरला ऑरेंज अ‌ॅलर्ट तर, पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, वाशिम, गोंदिया, गडचिरोलीला यलो अ‌ॅलर्ट दिला आहे.

13 सप्टेंबरला पावसाची स्थिती कशी?

हवामान विभागानं सोमवारसाठी पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूरला ऑरेंज अ‌ॅलर्ट जारी केला आहे. तर, मुंबई, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, अमरावती, आणि गोंदिया जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट दिला आहे.

14 सप्टेंबरला पावसाची स्थिती कशी?

हवामान विभागानं मंगळवारी पालघर, ठाणे, रायगड,पुणे, सातारा आणि कोल्हापूरला ऑरेंज अ‌ॅलर्ट जारी केला आहे. तर, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नांदेड, परभणी, हिंगोली नंदूरबार, जळगाव, धुळे, औरंगाबाद, जालना, भंडारा गोंदिया यलो अ‌ॅलर्ट दिला आहे.

15 सप्टेंबरला पावसाची स्थिती कशी?

हवामान विभागानं पालघर पुणे जिल्ह्याला ऑरेंज अ‌ॅलर्ट जारी केला आहे. तर, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, ठाणे, सातारा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया आणि चंद्रूपर जिल्ह्यांना यलो अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

नाशिकच्या नांदूर मध्यमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग

यंदा नाशिक जिल्ह्यात पावसाची सरासरी कमी जरी असली तरी पण गेल्या तीन-चार दिवसांपासून त्रंबकेश्वर आणि इगतपुरी तालुक्यात पावसाची संततधार सुरू असल्याने दारणा धरणातून 5 हजार क्यूसेक , काडवा धरणातून 500 तर वालदेवी धरणातून 100 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून हे पाणी निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दाखल होत असल्याने नांदूर-मधमेश्वर धरणातून 6 हजार 310 क्यूसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रातून जायकवाडी च्या दिशेने करण्यात येत आहे या पावसाच्या हंगामात आजपर्यंत साडेसह टीएमसी पाणी विसर्ग झाले आहे

तर शेतकरी मित्रांनो दिनांक 12 ते 15 सप्टेंबर पर्यंत राज्यात कसं वातावरण राहील याबद्दल चा हवामान अंदाज आपण बघितला आहे तर तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून ही माहिती जास्तीत जास्त शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि दररोज हवामान अंदाजासाठी आपल्या वेबसाईटला बुकमार्क करायला विसरू नका धन्यवाद

Close Visit Havaman Andaj

Scroll to Top