हवामान अंदाज महाराष्ट्र 2021 : राज्यात सुमारे दोन आठवड्यांपासून दडी मारणाऱ्या पावसाला सुरूवात झाली आहे. पाहूया आजचे हवामान अंदाज महाराष्ट्र live
राज्यात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. उद्या (ता.१७) कोकण, विदर्भात बहुतांशी ठिकाणी, तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.
मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे पश्चिम टोक हिमालयाच्या पायथ्याकडे असून, पूर्व भाग सर्वसाधारण स्थितीत आहे.
दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेश लगतच्या उपसागरामध्ये ३.१ किलोमीटर ते ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.
या वाऱ्यांच्या प्रभावामुळे या भागात मंगळवारी ता.१७ तारखेला सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. हे क्षेत्र पोषक ठरल्याने राज्यात बुधवारपर्यंत (ता. १८) पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
१७ ऑगस्ट आजचा विभागनिहाय पडणाऱ्या पावसाचा अंदाज
आजचे हवामान – (ता. १७) राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.
आजचा हवामान अंदाज कोकण विभाग
कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, इत्यादी जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे.
हवामान अंदाज मध्य महाराष्ट्र
मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, या जिल्ह्यात पावसाची शक्यता.
hawaman andaz marathwada | havaman andaj today
मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, उस्मानाबाद,या भागात मुसळधार पाऊस येऊ शकतो.
हवामान अंदाज विदर्भ | Vidarbha Weather Forecast
विदर्भातील भंडारा, अकोला, वाशीम जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे.
राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.
इतर बातम्या पण वाचा –
- Weather Update | 2 फेब्रुवारीपर्यंत थंडीची लाट, राज्यात इथे अवकाळी पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
- Rain Alert 2023: राज्यात मराठवाड्यासह “इथे” विजांच्या गडगडाटांसह पावसाचा इशारा; पहा आजचा हवामान अंदाज
- Panjab Dakh Havaman Andaj | वातावरणात अचानक झाला मोठा बदल; आता ‘या’ जिल्ह्यातही ‘हे’ चार दिवस अवकाळी पाऊस पडणार
- Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल ; ‘हे’ सात दिवस ‘या’ भागात थंडीत पाऊस कोसळणार !
- Weather Update : राज्यात आज या जिल्ह्यात कडाक्याची थंडी? पहा आजचा हवामानाचा अंदाज
उद्याचा हवामान अंदाज
कोकण, मराठवाड्याच्या काही भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. सोमवारी (ता.१६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलीमीटरमध्ये) :
कोकण :
- मुंबई : सांताक्रूझ ३१.
- पालघर : डहाणू ७५, पालघर ८२, तलासरी ३५, वसई ३४, विक्रमगड ३९.
- रायगड : म्हसळा ५८, मुरूड ३५, रोहा ४४, सुधागड पाली ३०, तळा ४०, उरण ३५.
- रत्नागिरी : दापोली ४०, लांजा ३०, मंडणगड ४१.
- ठाणे : भिवंडी ३५, ठाणे ५६.
मध्य महाराष्ट्र :
- सातारा : महाबळेश्वर ३४.
मराठवाडा :
- बीड : माजलगाव ४५.
- जालना : आंबड १२४.
- लातूर : लातूर ४३, शिरूर अनंतपाळ ३०.
- नांदेड : बिलोली ४६, धर्माबाद ३८.
- परभणी : धालेगाव ५०, पाथरी ४२, सोनपेठ ४७.
व्हिडिओ स्वरूपात पहा :
मित्रांनो, आजचे हवामान अंदाजाची बातमी आवडल्यास इतर शेतकऱ्यांना सुद्धा शेयर करा व कृषी पत्रकारितेला पाठिंबा द्या. धन्यवाद !