ब्रेकिंग ! पंजाबराव डख यांचा 13 जिल्ह्यांना अलर्ट जारी, ‘या’ 13 जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस | Panjabrao Dakh Havaman Andaj Today - हवामान अंदाज महाराष्ट्र 2024 - शेतकरी सेवार्थ.!
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग
. .
. .
Trending Now

ब्रेकिंग ! पंजाबराव डख यांचा 13 जिल्ह्यांना अलर्ट जारी, ‘या’ 13 जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस | Panjabrao Dakh Havaman Andaj Today

Panjabrao Dakh Aajcha havaman Andaj : राज्यात गेल्या काही दिवसांपासून परतीचा पाऊस (Rain) चांगलाच बरसत आहे. यामुळे शहरी भागात जनजीवन विस्कळीत होत आहे, तर शेत शिवार जलमग्न झाली आहेत. त्यामुळे वावरातील काढण्यासाठी उभी असलेली पिके पूर्णतः वाया जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.

खरीप हंगामातील पिके आता अंतिम टप्प्यात असल्याने या परतीच्या पावसाचा (Monsoon) पिकांना मोठा फटका बसत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात सध्या सोयाबीन तसेच मका या पिकाची काढणी प्रगतीपथावर आहे.

यामुळे परतीचा पाऊस (Monsoon News) या पिकांसाठी घातक ठरत आहे. दरम्यान राज्यात काल राजधानी मुंबई आणि ठाणे परिसरात पावसाची (Rain Alert) हजेरी पाहायला मिळाली. याशिवाय राज्यातील बीड, कोल्हापूर, धुळे, पालघर, लातूर, सोलापूर, सांगली, अहमदनगर, पुणे या जिल्ह्यात पावसाची चांगली धुवाधार बॅटिंग झाली आहे.

हे पण वाचा -   Maharashtra weather : राज्यात आजही गारपीट, वादळी वाऱ्याचा कहर, हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट; 'या' जिल्ह्यांना बसणार फटका

दरम्यान भारतीय हवामान विभागाने आज देखील महाराष्ट्रात पावसाची शक्यता असल्याचे सांगितले आहे. हवामान विभागाने वर्तवला आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार आज अहमदनगर जिल्ह्यासमवेतच कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची शक्यता आहे. या अनुषंगाने अहमदनगर जिल्ह्याला ॲलर्ट जारी केला असून वर नमूद केलेल्या तीन विभागांना देखील भारतीय हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दरम्यान आपल्या हवामान अंदाजासाठी शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय व्यक्तिमत्व अर्थातच पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaj) समोर आला आहे. पंजाबराव (Panjabrao Dakh News) यांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार आज 13 ऑक्टोबर रोजी राज्यातील नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बीड, जालना, परभणी, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी, नाशिक आणि जळगाव या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे.

हे पण वाचा -   Weather Update: पुढील 3 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, पुण्यासह इथे IMD कडून हाय अलर्ट

पंजाबराव यांनी उर्वरित महाराष्ट्रात देखील आज पावसाची शक्यता असल्याचे सांगितले आहे. राज्यात उर्वरित भागात तुरळक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो तर काही ठिकाणी हलक्‍या रिमझिम सऱ्या देखील बरसतील असा पंजाब रावांचा अंदाज आहे. तसेच उद्यापासून पावसाचा जोर कमी होणार असल्याचे पंजाबराव यांनी नमूद केले आहे.

पंजाबराव यांच्या मते 14 आणि 15 ऑक्टोबर रोजी राज्यात पाऊस पडेल मात्र पावसाचा जोर कमी राहणार आहे. याशिवाय 16 आणि 17 तारखेला देखील तुरळक ठिकाणी पाऊस कोसळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र राज्यात 19 तारखेपासून जोरदार स्वरूपाच्या थंडीला सुरुवात होणार आहे. यामुळे येत्या काही दिवसात थंडीला सुरुवात झाल्यास फळबाग पिकांना तसेच इतर शेती पिकांना पोषक वातावरण लाभणार आहे. 

हे पण वाचा -   महाराष्ट्रात मुसळधार पावसाला कधीपासून सुरुवात होणार ? पंजाबरावांचा अंदाज काय ?
शेअर नक्की करा:
Close Visit Havaman Andaj