Punjab Dakh Monsoon Update: गेल्या काही दिवसात राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाने (Monsoon) हजेरी लावली असल्याने शेतकरी बांधवांच्या संकटात भर पडली आहे.
राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी सारखा पाऊस कोसळल्याने खरीप हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. यामुळे शेतकरी बांधवांना हजारो रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागला आहे.
यावर्षी पुन्हा पावसाचा (Monsoon News) लहरीपणा शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे. शेतकऱ्यांच्या मते, राज्यात कोसळत असलेल्या अतिवृष्टी सारख्या पावसामुळे (Rain) त्यांच्यावर दुबार पेरणी करण्याचे संकट ओढावले आहे.
यामुळे शेतकरी बांधवांच्या खर्चात भर पडणार असून हजारो रुपयांचा खर्च वाया जाणार आहे. दरम्यान, राज्यात अनेक भागात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस ओसरला असल्याचे वृत्त समोर येत आहे.
यामुळे शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा समाधानाचे भाव बघायला मिळत आहेत. मात्र असे असताना हवामानात मोठा बदल होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ञ परभणी भूमिपुत्र पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांनी वर्तवला आहे.
पंजाब रावांच्या या अंदाजामुळे निश्चित शेतकरी बांधवांच्या चेहर्यावर पुन्हा एकदा निराशाचे भाव झळकत आहेत. पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या सुधारित मान्सून अंदाजानुसार (Panjabrao Dakh Havaman Andaz), आज पासून राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे.
आज 21 जुलै ते 23 जुलै पर्यंत राज्यात पाऊस बघायला मिळणार नाही. शेतकरी बांधवांनी या उघडीप असलेल्या काळात आपली शेतीची कामे करून घ्यावेत असे देखील पंजाबराव यांनी नमूद केले आहे. कारण की 23 जुलै नंतर राज्यात पुन्हा एकदा पावसाचे वातावरण तयार होणार आहे.
पंजाबराव (Panjabrao Dakh News) यांनी वर्तवलेल्या सुधारित हवामान अंदाजानुसार 24 25 आणि 26 जुलै रोजी राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस कोसळणार आहे. या कालावधीत पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भमध्ये पावसाचा जोर अधिक राहणार असल्याचे देखील डख यांनी नमूद केले आहे.
या तीन दिवसानंतर पुन्हा एकदा पावसाची उघडीप बघायला मिळणार आहे. यानंतर मात्र 28 29 30 जुलै रोजी पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे. निश्चितच पुन्हा एकदा शेतकरी बांधवांच्या चिंतेत पावसामुळे भर पडणार आहे.
मान्सूनच्या सुरुवातीला पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकरी बांधवांना आता पाऊस उघडण्याची वाट बघावी लागत आहे. निश्चितच पावसाचा लहरीपणा शेतकऱ्यांच्या मुळावर उठला असल्याचे चित्र आहे.
हे पण वाचा –
- Maharashtra Weather Forecast : राज्यात पुढचे ७२ तास मुसळधार पाऊस; मुंबई, पुण्यासह ८ जिल्ह्यांना अलर्ट जारी
- Weather Update : राज्यात मुसळधार पावसाचा इशारा! कुठे ऑरेंज तर कुठे यलो अलर्ट; वाचा हवामान विभागाचा अंदाज
- Maharashtra Rain Update : येत्या चार ते पाच दिवसांत राज्यात ‘या’ जिल्ह्यात मुसळधार; वाचा हवामान विभागाचा अंदाज
- IMD Rain Alert : राज्यासाठी पुढील चार दिवस महत्त्वाचे; ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार मेघगर्जनेसह पाऊस, IMD कडून अलर्ट जारी
- Maharashtra Rain : महाराष्ट्रात पुन्हा पावसाच्या मुसळधारा? पहा आजचा नवीन हवामान अंदाज