Imd Alert : महाराष्ट्रात सध्या थंडीचा जोर वाढत आहे. यामध्ये अजूनच वाढ होणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने सांगितले आहे. दरम्यान, या हिवाळ्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रात मात्र पावसाची शक्यता नाही. हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी पाच ते सात तारखेपर्यंत मराठवाडा आणि विदर्भ या ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता वर्तवली आहे.
मात्र उर्वरित राज्यात थंडीचा जोर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ज्या ठिकाणी ढगाळ वातावरण आहे त्या ठिकाणी देखील पावसाची शक्यता नाहीये. यामुळे निश्चितच राज्यातील शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार आहे. मात्र राज्यात थंडीचा जोर कायम राहणार असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले जात आहे.
दरम्यान आता भारतीय हवामान विभागाने पुढील २४ तासांत आंध्र प्रदेश, तटीय तामिळनाडू आणि अंदमान निकोबार बेटांवर हलका पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे नमूद केले आहे. मात्र उत्तर राजस्थान आणि हरियाणाच्या काही भागात थंडीची लाट ते तीव्र शीतलहरीची शक्यता आहे. पंजाब आणि हिमाचल प्रदेशच्या काही भागातही थंडीची लाट येऊ शकते.
उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब आणि हरियाणाच्या काही भागांमध्येही थंडीची लाट येऊ शकते. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि उत्तर-पश्चिम राजस्थानचा काही भागात धुक्यामुळे व्हिजिबिलिटी देखील कमी होऊ शकते. निश्चितच आंध्रप्रदेश, तामिळनाडूचा किनारी भाग आणि अंदमान निकोबार बेटांवर पावसाची शक्यता असल्याने संबंधित भागातील जनतेला सतर्क राहण्याची गरज आहे.
निश्चितच ऐन थंडीत कोसळणारा हा पाऊस वातावरणात होत असलेल्या अमुलाग्र बदलाची ग्वाही देत आहे. कुठे ना कुठे ग्लोबल वॉर्मिंगचा हा विपरीत परिणाम असल्याचे जाणकार देखील नमूद करतात. दरम्यान महाराष्ट्रात पावसाची शक्यता नसल्याने रब्बी हंगामासाठी लगबग करत असलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर निश्चितच समाधान पाहायला मिळणार आहे.
यामुळे राज्यातील शेती कामाला वेग येणार आहे. मात्र शेती कामे करताना शेतकऱ्यांना सजग राहण्याची आवश्यकता आहे. कारण की राज्यातही शीतलहर म्हणजेच थंडीची लाट येऊ शकते असं हवामान विभागाने म्हटले आहे.
हे पण वाचा –
- Weather Update | 2 फेब्रुवारीपर्यंत थंडीची लाट, राज्यात इथे अवकाळी पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
- Rain Alert 2023: राज्यात मराठवाड्यासह “इथे” विजांच्या गडगडाटांसह पावसाचा इशारा; पहा आजचा हवामान अंदाज
- Panjab Dakh Havaman Andaj | वातावरणात अचानक झाला मोठा बदल; आता ‘या’ जिल्ह्यातही ‘हे’ चार दिवस अवकाळी पाऊस पडणार
- Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल ; ‘हे’ सात दिवस ‘या’ भागात थंडीत पाऊस कोसळणार !
- Weather Update : राज्यात आज या जिल्ह्यात कडाक्याची थंडी? पहा आजचा हवामानाचा अंदाज