hawaman andaz

आजचे हवामान : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार । या तारखेपासून पून्हा अति मुसळधार hawaman andaz

आजचे हवामान 2021 | hawaman andaz

नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आजचे हवामान अंदाज महाराष्ट्र मध्ये. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र उद्यापासून महाराष्ट्रात पुन्हा पावसाचे जोरदार आगमन. पाहुयात काय आहे यासंबंधीची सविस्तर माहिती.

आजचे हवामान अंदाज 2021 live

या आठवड्याच्या मध्यात बंगालच्या खाडीमध्ये एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. 20 जुलै च्या आसपास बंगालच्या खाडीमध्ये एक चक्रकर हवेची स्थिती निर्माण होईल. त्यानंतर पुढच्या चोवीस तासांमध्ये म्हणजे 21 जुलैला चक्राकार वाऱ्यांची स्थिती चे कमी दाबाच्या पट्ट्यात रुपांतर होईल.

हे कमी दाबाचे क्षेत्र काही प्रमाणात जमिनीवर तर काही प्रमाणात समुद्री भागावर असेल. पुढील काही दिवसांमध्ये एक कमी दाबाचे क्षेत्र महाराष्ट्रासह शेजारच्या मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यावर प्रभाव दाखवायला सुरुवात करेल.

K.S. Hosalikar Twitter Havaman Andaj

या कमी दाबामुळे महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाच्या आगमनाला सुरुवात होईल. विशेषता कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या बऱ्याच ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल, तर आज दिवसभरामध्ये महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण बऱ्यापैकी कमी असेल.

उद्याचा हवामान अंदाज

कोकण आणि घाट परिसर वगळता उर्वरित भागात पावसाच्या काही सरींची शक्यता आहे. तर कोकण किनारपट्टी आणि घाट परिसरामध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

हवामान

पण उद्यापासून महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये जोरदार पावसाचे आगमन होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याच्या मुंबई येथील प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार आज रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून,

पालघर, ठाणे, सातारा, कोल्हापूर व विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांना मेघगर्जनेसह मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हे पण वाचा :

मित्रांनो हीच माहिती व्हिडीओ स्वरुपात पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आवश्य करा व खालील व्हिडिओ पाहायला विसरू नका.

तर उर्वरित भागात पुढच्या चोवीस तासात पावसाची शक्यता नसल्याची हवामान खात्याकडून माहिती येत आहे. तर आत्ताच्या करीत पुन्हा नवीन माहिती सोबत धन्यवाद.

Related Posts

weather-alert-weather-forecast-monsoon-update

Weather Update: उत्तर-मध्य भारतात पावसाचा जोर वाढला; काय असेल महाराष्ट्राची स्थिती?

the-return-monsooon-will-start-from-this-date-ramchandra-sable-weather-forecast

Monsoon 2021 : या तारखेपासून सुरू होणार परतीचा पाऊस रामचंद्र साबळे हवामान अंदाज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

X