Monsoon Update 2022: नमस्कार शेतकरी मित्रांनो हवामान अंदाज महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत आहे राज्यामध्ये गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी मान्सूनने सर्वत्र हजेरी लावण्याचा हवामान विभागाने जाहीर केले होते. परंतु असे असतानाही राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसाची उघडीप आपल्याला गेल्या दोन ते तीन दिवसांमध्ये पाहायला मिळाली आणि कुठेही पेरणीयोग्य मुसळधार असा मान्सूनचा पाऊस झाला नव्हता.
हवामान अंदाज महाराष्ट्र 2022
तर गेल्या चोवीस तासांमध्ये राज्यातील या जिल्ह्यांमध्ये धो-धो पावसाने हजेरी लावली आहे आणि याचमुळे लागवडीला सुद्धा वेग आलेला आहे तर जाणून घेऊया या बद्दल सविस्तर माहिती आणि पाहूयात पुढील 24 ते 48 तासात तुमचे जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज हा कशाप्रकारे असणार आहेत तर त्या साठी हा लेख पूर्ण वाचा.
Monsoon Update in Maharashtra
(Vidarbha) विदर्भात तीन दिवसांपूर्वीच मान्सूनचे आगमन झाले आहे. असे असले तरी पेरणी योग्य पाऊस झाला नसल्याने (Kharif Season) खरीप हंगामावरील चिंतेचे ढग हे कायम होते. मात्र, रविवारची पहाट (Gondia) गोंदियाकरांसाठी दिलासादायक ठरली आहे. बळीराजा साखर झोपेत असतानाच वरुणराजाने अशी काय कृपादृष्टी केली आहे की सर्व शिवार पावसाने तृप्त झाला आहे. त्यामुळे एक उत्साह निर्माण झाला असून आता खरिपातील रखडलेल्या कामांना गती येणार आहे. खरीपूर्व मशागतीची कामे पूर्ण झालेले शेतकऱ्यांचा पेरणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
20 दिवसांची प्रतीक्षा संपली, सातत्य गरजेचे
यंदा वेळेपूर्वी मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, अनिश्चित व अनियमित पावसाची वाट पाहण्यात 20 दिवस गेले आहेत. आता कुठे गोंदिया जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली असून यामध्ये सातत्य राहिले लवकरच चित्र बदलेन असा विश्वास कृषी विभागाला आहे. असे असताना देखील शेतकऱ्यांनी जमिनीतील ओल पाहूनच खरीप पेरणी करणे गरजेचे आहे. 15 दिवस पेरण्या लांबणीवर गेल्या आहेत पण ओल नसताना चाढ्यावर मूठ ठेवली तर पेरणीचा उपयोग नाही. त्यामुळे कृषी अधिकाऱ्यांचा सल्ला घेऊनच शेतकऱ्यांनी निर्णय घेणे गरजेचे आहे.
गोंदिया जिल्ह्यातूनच विदर्भात मान्सूनचे आगमन
विदर्भात तीन दिवसांपूर्वीच मान्सूनचे आगमन झाले होते. शिवाय गोंदिया जिल्ह्यातूनच आगमन झाले असतानाही अपेक्षित पाऊस झाला नव्हता. मात्र, आठवड्याच्या शेवटी विदर्भात मध्यम ते मुसळधार पाऊस बरसेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. अखेर रविवारची सुरवात धुवांधार पावसाने झाली आहे. त्यामुळे पेरणीपूर्व मशागतीची कामे तर होणारच आहेत पण ज्या मंडळात 75 ते 100 मिमी दरम्यान पाऊस झाला त्या ठिकाणी शेतकरी धान पिकाची पेरणी करणार आहेत.
हे पण वाचा:
- Punjab Dakh यांचा एप्रिल महिन्यातील हवामान अंदाज ! ‘या’ तारखेला मुसळधार Rain पडणार पहा पंजाब डख हवामान अंदाज
- Weather Update | राज्यात आज ‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता! हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज
- Maharashtra rain IMD Alert: 14 मार्चपासून ‘इतके’ दिवस राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस कोसळणार; ‘या’ जिल्ह्यात गारपीटीची शक्यता
- IMD Weather Alert : पावसाचे सावट कायम! येत्या २४ तासांत या राज्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार बरसणार; अलर्ट जारी
- Panjab Dakh Havaman Andaj | पंजाबराव डख यांचा 10 मार्चपर्यंत या 11 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा, पहा आजचा हवामान अंदाज
- Panjabrao Dakh Weather Report | ‘या’ जिल्ह्यांमध्ये येत्या आठवड्यात पाऊस पडण्याची शक्यता, पंजाबराव डख यांचा अंदाज
- Panjab Dakh Havaman Andaj | २०२३ मध्ये मान्सून कसा असेल? कोणत्या महिन्यात होणार आगमन? वाचा पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज
- Weather Update | 2 फेब्रुवारीपर्यंत थंडीची लाट, राज्यात इथे अवकाळी पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
- Rain Alert 2023: राज्यात मराठवाड्यासह “इथे” विजांच्या गडगडाटांसह पावसाचा इशारा; पहा आजचा हवामान अंदाज
- Panjab Dakh Havaman Andaj | वातावरणात अचानक झाला मोठा बदल; आता ‘या’ जिल्ह्यातही ‘हे’ चार दिवस अवकाळी पाऊस पडणार
- Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल ; ‘हे’ सात दिवस ‘या’ भागात थंडीत पाऊस कोसळणार !
- Weather Update : राज्यात आज या जिल्ह्यात कडाक्याची थंडी? पहा आजचा हवामानाचा अंदाज
नाव | हवामान अंदाज महाराष्ट्र राज्य |
---|---|
विभाग | भारतीय हवामान शास्त्र विभाग |
पत्ता | हवामान विभाग – IMD |
दिनांक | 19 जून 2022 |
संकलन | आजचे हवामान महाराष्ट्र 2022 |
पंजाब डख हवामान अंदाज Whatsapp Group
मित्रांनो दररोज जिल्हानिहाय हवामान अंदाज मिळवण्यासाठी आणि त्याचबरोबर पंजाब डख हवामान अंदाज व हवामान विभागाचे अपडेट निशुल्क मिळवण्यासाठी इथे क्लिक करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा आणि हि माहिती जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद