Maharashtra Rain Alert: जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेत शिवारांमध्ये आंतरमशागत आणि फवारणीच्या कामांनी वेग धरला आहे. दरम्यान मंगळवार २७ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात कमी अधिक पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे.
अमरावती येथील हवामान अभ्यासक प्रा. अनिल बंड यांच्या माहितीनुसार वायव्य भारतात प्रतीचक्राकार वारे निर्माण झाल्यामुळे पंजाब, हरियाणा, राजस्थान, चंदीगड व दिल्लीमधून लवकरच मान्सुन निरोप घेण्यासाठी वातावरण अनुकूल आहे. बंगालचा उपसागरात बंगाल-ओरिसा किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे.
त्याची तिव्रता वाढण्याची शक्यता आहे. या हवामान शास्त्रीय परिस्थितीमुळे विदर्भात २२ सप्टेंबरला बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या तर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. २१ आणि २२ सप्टेंबरपर्यंत विदर्भात बहुतेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. पूर्व विदर्भात काही ठिकाणी गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. २२ सप्टेंबरला अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे.
२३ तारखेलाही काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अशा प्रकारे २७ सप्टेंबरपर्यंत कमी अधिक प्रमाणात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान सततच्या पावसामुळे काटेपुर्णा, वान, दगडपारवा, पोपटखेड, मोर्णा, निर्गुणा या प्रकल्पात मुबलक पाणीसाठा जमला आहे. जिल्ह्यात पाऊस झाल्यास कोणत्याही क्षणी पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो. त्याअनुषंगाने अशा स्थितीत नदी नाला काठावरील गावांना व शहरी भागातील सखल भागातील वस्त्यांमधील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून वेळच्या वेळी करण्यात येत आहे.
अनुक्रमणिका
Toggleहे पण वाचा
आजचा हवामानाचा अंदाज
नाव | हवामान अंदाज महाराष्ट्र राज्य |
---|---|
विभाग | प्रा. अनिल बंड |
पत्ता | अमरावती, महाराष्ट्र |
दिनांक | 22 सप्टेंबर 2022 |
संकलन | आजचे हवामान महाराष्ट्र 2022 |
Web Title: Chance Of More Or Less Rain In The District Till September 27; Forecast By Meteorological Department
पंजाब डख हवामान अंदाज Whatsapp Group
मित्रांनो दररोज जिल्हानिहाय हवामान अंदाज मिळवण्यासाठी आणि त्याचबरोबर पंजाब डख हवामान अंदाज व हवामान विभागाचे अपडेट निशुल्क मिळवण्यासाठी इथे क्लिक करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा आणि हि माहिती जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद