माॅन्सूनच्या (Monsoon Update) परतीच्या प्रवासासाठी पोषक वातावरणाची निर्मिती झाली आहे. पुढील दोन दिवसांत माॅन्सून परतीच्या प्रवासावर निघण्याची शक्यता हवामान विभगानं विर्तविली. तर राज्यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात (Marathwada) तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजही (Heavy Rainfall) हवामान विभागानं वर्तविला आहे.
पुढील दोन दिवसांत माॅन्सून परतीच्या प्रवासावर निघण्याची शक्यता हवामान विभगानं विर्तविली. तर राज्यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजही हवामान विभागानं वर्तविला आहे. Monsoon Return
केंद्रभागी जास्त भाग असणारी आणि वारे बाहेरच्या दिशेने फेकणारी प्रणाली (अॅन्टी सायक्लोन) तयार झाली आहे. त्यामुळं पश्चिम राजस्थान, पंजाब आणि हरियानामध्ये पुढील ५ कोरडे हवामान राहण्याचा अंदाज आहे. ही पोषक स्थिती असल्यामुळं बुधवारपर्यंत माॅन्सून वायव्य भारतातील राजस्थान, पंजाब, हरियाना आणि गुजरातच्या काही भागातून माॅन्सून माघारी फिरण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तविली.
राज्यातही काही भागांत जोरदार पाऊस पडत आहे. कोकणातील रायगड, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये काही मंडळात जोरदार पाऊस झाला. तर बहुतांशी ठिकाणी हलक्या सरी पडल्या. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात मात्र पावसाचा जोर कमी होता. तसचं मध्य महाराष्ट्रातील पुणे, नगर, नाशिक, धुळे, नंदूरबार आणि जळगाव जिल्ह्यात सोमवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसानं हजेरी लावली. धुळे आणि जळगाव जिल्ह्यात बहुतांशी भागांत पावसानं हजेरी लावली होती. तर नंदूरबार जिल्ह्यातही ठिकठिकाणी पाऊस झाला. पुणे आणि नाशिक जिल्ह्यातही बहुतांशी मंडळांमध्ये पावसानं हजेरी लावली.
मराठवाड्यातील काही मंडळात विजांसह तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, लातूर, बीड, हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यातही काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस झाला. तर अनेक ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. विदर्भातही अनेक मंडळांत विजांसह हलक्या पावसानं हजेरी लावली.
अनुक्रमणिका
Toggleहे पण वाचा
हवामान विभागानं उद्या सकाळपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही मंडळांमध्ये पावसाचा जोर अधिक राहील, असा अंदाजही हवामान विभागानं जारी केलाय.
इतर सर्व हवामान अंदाज
- Havaman Fact Check : जानेवारी २०२३ पर्यंत मान्सूनचा मुक्काम वाढणार हा खरंच हवामान खात्याचा अंदाज होता का?
- Maharashtra Monsoon – राज्यात पुढील 4 दिवस पावसाचा जोर कायम राहणार, हवामान विभागाकडून ऑरेंजसह यलो अलर्ट जारी
- Panjab Dakh Havaman Andaj । पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज, येथे होणार मुसळधार पाऊस..
- Weather Update Rain Alert : उद्याचे हवामान आणि येत्या २ दिवसांचा पावसाचा अंदाज; या ११ जिल्ह्यांना पावसाचा इशारा
- Maharashtra Rain Update: पूढील ३ दिवसांचा हवामान अंदाज; या भागात मुसळधार पावसाचा इशारा
आजचा हवामानाचा अंदाज
नाव | हवामान अंदाज महाराष्ट्र राज्य |
---|---|
विभाग | भारतीय हवामान शास्त्र विभाग |
पत्ता | हवामान विभाग – IMD |
दिनांक | 20 सप्टेंबर 2022 |
संकलन | आजचे हवामान महाराष्ट्र 2022 |
Web Title: Maharashtra rain news pune satara sangli kolhapur marathwada vidarbha paschim maharashtra imd alert heavy rai ssa
पंजाब डख हवामान अंदाज Whatsapp Group
मित्रांनो दररोज जिल्हानिहाय हवामान अंदाज मिळवण्यासाठी आणि त्याचबरोबर पंजाब डख हवामान अंदाज व हवामान विभागाचे अपडेट निशुल्क मिळवण्यासाठी इथे क्लिक करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा आणि हि माहिती जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद