Rain Update : मुंबईसह "राज्यातील या भागात" पुढील 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता, हवामान केंद्राकडून ऑरेंज अलर्ट - हवामान अंदाज महाराष्ट्र 2024 - शेतकरी सेवार्थ.!
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग
. .
. .
Trending Now

Rain Update : मुंबईसह “राज्यातील या भागात” पुढील 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता, हवामान केंद्राकडून ऑरेंज अलर्ट

Rain Update : गुरूवारी मुंबईत सलग 12 तास पाऊस झाल्यानंतर मुंबई आणि आसपासच्या परिसरात पाणी साचले आहे

Rain Update :  कोकण किनारपट्टी भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने हवामान विभागाने जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई, मुंबई उपनगरसह कोकणामध्ये पुढील 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गुरूवारी सकाळपासूनच मुंबईमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली होती. मुंबईसह नवी मुंबई, ठाणे आणि वसई विरारमध्ये पावसाचा जोर वाढला होता. यानंतर पुढील चार ते पाच दिवसांमध्ये संपूर्ण राज्यात मान्सून सक्रिय राहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून मुंबई महापालिकेला अलर्ट, तर कोकणाला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, मध्यरात्री मुंबईत पाऊस थांबला होता. मात्र सकाळी काही वेळातच पुन्हा पावसाला सुरुवात झाली.

आज पहाटे पुन्हा मुसळधार पाऊस सुरू

मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी आज मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे. मुंबईचा पूर्व आणि पश्चिम उपनगरात सध्या जोरदार पावसाची सुरुवात झाली आहे. अंधेरी, गोरेगाव, बोरिवली, वांद्रे, कुर्ला, सायन, दादर, मुलुंड या सर्व परिसरामध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबईत काल संध्याकाळी मुसळधार पाऊस झाल्यामुळे मुंबईच्या सखल भागामध्ये सर्व ठिकाणी पाणी भरले होते, मात्र मध्यरात्री पाऊस थांबल्यामुळे सखल भागांमधून पाणी निघून गेला आहे. आज पहाटे पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाला आहे,असंच जोरदार पाऊस सुरू राहिला तर पुन्हा मुंबईच्या सखल भागामध्ये पाणी भरायला सुरुवात होणार आहे.

हे पण वाचा -   Weather Alert - मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू, हवामान खात्याने वर्तवला; अंदाज इथे धो-धो पाऊस

मुंबईत सलग 12 तास पाऊस, आसपासच्या परिसरात साचले पाणी 
गुरूवारी मुंबईत सलग 12 तास पाऊस झाल्यानंतर मुंबई आणि आसपासच्या परिसरात पाणी साचले आहे. पहिल्यास मुसळधार पावसात मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईतील पावसाची आकडेवारी समोर आली आहे. मुंबईत सकाळी 8 ते रात्री 8.30 पर्यंत बारा तासात कुलाबा  176 मिमी पावसाची नोंद करण्यात आला आहे. मुंबईतील सांताक्रुज 137 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

पालिकेचा नालेसफाई दावा फोल 
काल झालेल्या पावसामुळे अंधेरी सब वे, हिंदमाता, सक्कर पंचायत वडाळा, एसआयईएस कॉलेज वडाळा, किंग्ज सर्कल, सायन आदी काही सखल भागात काही प्रमाणात पाणी साचले. त्यामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दरम्यान, वसई विरार आणि मीरा भाईंदर शहरात बुधवारी रात्रभर पावसाच्या रिमझिम सरी बरसत आहे.  तर अधून मधून जोरदार पाऊस आहे. काल दुपारनंतर वसई विरार मध्ये पावसाने जोर धरलेला पाहायला मिळाला आहे.  वसई, नालासोपारा आणि विरार मधील सखल भागात पाणी साचण्यास सुरूवात झाली.  यामुळे  पालिकेचा नालेसफाई दावा फोल ठरल्याच दिसून येत आहे. 

हे पण वाचा -   Maharashtra Weather Update: थंडी सोबत अवकाळी पाऊस हजेरी लावणार का? पहा पुढील ३ दिवसांचा हवामान अंदाज

पुढील तीन ते चार दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढणार
दरम्यान, पुढील तीन ते चार दिवसांमध्ये दक्षिण कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं येत्या 3 ते 4 दिवसांत कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्या परिस्थितीत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यातल्या घाटमाथ्यावर उद्या आणि परवा मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मध्य रेल्वे मार्गावर तांत्रिक बिघाड
गेल्या 12 तासांत मुंबईसह उपनगर आणि ठाणे परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे आणि त्यामुळे मुंबई जाम झाली आहे. अंधेरी, दादर, परळ भागात पाणी साचलं आहे. दादर आणि परळमध्ये गुरूवारी पाच किलोमीटरपर्यंत गाड्यांच्या रांगा लागल्यात मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. मध्य रेल्वे मार्गावर दादर स्टेशनवर तांत्रिक बिघाड झाल्यानं लोकलच्याही रांगा लागल्या होत्या. त्यामुळे प्रवासी लोकलमध्ये अडकले होते. मुंबईत रस्ते जाम आणि लोकल ठप्प झाल्याचे चित्र पाहायला मिळाले, काल झालेल्या जोरदार पावसामुळे मुंबई तुंबली आहे. मुंबई, मुंबई उपनगरसह कोकणामध्ये पुढील 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हे पण वाचा -   Panjab Dakh Havaman Andaj | पंजाबराव डख यांचा 10 मार्चपर्यंत या 11 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा, पहा आजचा हवामान अंदाज

हे पण वाचा –

हवामान अंदाज विदर्भ live

तर शेतकरी मित्रांनो पुढील पाच दिवसांमध्ये अशा प्रकारचा वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. तुमचा जिल्हा कोणता आहे आम्हाला कमेंट शिक्षण मध्ये अवश्य सांगा आणि हवामान अंदाज बातमी आवडल्यास इतर शेतकऱ्यांना सुद्धा शेअर करायला विसरू नका.

इतर हवामानाच्या बातम्या –

नावहवामान अंदाज महाराष्ट्र राज्य
विभागभारतीय हवामान शास्त्र विभाग
पत्ताहवामान विभाग – IMD
दिनांक1 जुलै 2022
संकलनआजचे हवामान महाराष्ट्र 2022

पंजाब डख हवामान अंदाज Whatsapp Group

मित्रांनो दररोज जिल्हानिहाय हवामान अंदाज मिळवण्यासाठी आणि त्याचबरोबर पंजाब डख हवामान अंदाज व हवामान विभागाचे अपडेट निशुल्क मिळवण्यासाठी इथे क्लिक करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा आणि हि माहिती जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद

शेअर नक्की करा:
Close Visit Havaman Andaj