Weather Update: नमस्कार हवामान अंदाज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. राज्यात विजांच्या कडकडाटासह पुन्हा पाऊस सक्रिय झाला आहे. तर पुढील चार ते पाच दिवसात राज्यात पावसाचा मुक्काम वाढला आहे. पाहूयात याविषयी सविस्तर बातमी.
सध्या राज्याच्या काही भागात दुपारनंतर अचानक वातावरण होऊन विजांच्या कडकडाटासह वादळी वारा व जोरदार पाऊस पडत आहे. तर हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील चार ते पाच दिवस राज्यातील कोकण, मराठवाडा, आणि मध्य महाराष्ट्रातील बऱ्याच भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होईल. असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
तर आज मराठवाड्यातील औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, बीड, परभणी, नांदेड तसेच मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, सांगली, सोलापूर, कोल्हापूर त्यासोबतच कोकणातील ठाणे, रायगड या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होईल.
तर कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग व मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा या जिल्ह्याच्या तुरळक भागात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आले आहेत.
हे पण वाचा-
हे पण वाचा
- BajarBhav Today
- डाळिंब लागवडीचे महत्त्व आणि महाराष्ट्रातील परिस्थिती
- Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुढील 24 तास महत्त्वाचे; Heatwave आणि Thunderstorm चा दुहेरी इशारा
- Havaman Andaj Today: राज्यात पावसाचे आगमन; काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, गारपीट व वादळी वाऱ्याचा इशारा
- Rain Alert: महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस आणि गारपिटीचे संकट; ऑरेंज अलर्ट जारी
तर मराठवाड्यातील जालना, हिंगोली व उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव तसेच कोकणात पालघर, मुंबई या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
| नाव | भारतीय हवामान विभागाचा हवामान अंदाज |
|---|---|
| विभाग | प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई |
| पत्ता | IMD Mumbai |
| दिनांक | 6 ऑक्टोबर 2021 |
| संकलन | आजचे हवामान महाराष्ट्र 2021 |
मित्रांनो दररोज जिल्हानिहाय हवामान अंदाज मिळवण्यासाठी आणि त्याचबरोबर पंजाब डख हवामान अंदाज व हवामान विभागाचे अपडेट निशुल्क मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा आणि हि माहिती जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद








