weather rain

Weather Forecast : कोकण, पश्चिम महाराष्ट्र ते मराठवाड्यातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता, IMD कडून यलो ॲलर्ट जारी

हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील पुणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर, सांगली जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली आहे.

मुंबई: भारतीय हवामान विभागाच्या मुंबई विभागानं 15 नोव्हेंबरला चार दिवसांसाठीचा हवामानाचा अंदाज जारी केला होता. अरबी समुद्रातील हवामानाच्या स्थितीमुळं महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील पुणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर, सांगली जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. मुंबई, ठाणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

राज्यात ठिकठिकाणी पावसाची हजेरी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोडामार्ग, वेंगुर्ला, कुडाळ, मालवण , कणकवली, देवगड, वैभववाडी या ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. कोल्हापूरमधील चंदगड, शिरोळ,नृसिंहवाडी, नांदणी ,जयसिंगपूर, शिरढोण, कुरूंदवाड , दत्तवाड आजरा, मलिग्रे, उतुर आणि गवसेमध्ये पाऊस झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, कोर्टी, केम, केतूर, जेऊर, साळसे, उमरड, अर्जुननगर मध्येही पाऊस झाला आहे.

गेल्या 24 तासात कुठे पाऊस पडला?

रत्नागिरीमध्ये 38 मिमी, वेंगुर्ला, नांदेड, सातारा, कोल्हापूर, बारामती, पुणे, सांगलीमध्ये पावसानं हजेरी लावली.

वाशिममध्ये पावसाची हजेरी

वाशिमच्या मंगरुळपिर शहरासह ग्रामीण भागात काही ठिकाणी अवकाळी पाऊस सुरू आहे. जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. अवकाळी पावसाचा रब्बीच्या कामांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

नांदेड शहरात जोरदार पाऊस

नांदेड शहरात रात्री पावसाने जोरदार हजेरी लावली. विजांचा कडकडाटासह जोरदार पाऊस बरसला. अचानक आलेल्या पावसामुळे रात्री उशिरा घरी जाणाऱ्यांची पंचायत झाली होती. शिवाय शहरातील अनेक रस्त्यावरील खड्यांमध्ये पाणी साचले होते. ध्या थंडीचे दिवस असून त्यात पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात बदल झाला असून याचा परिणाम आरोग्य होण्याची शक्यता आहे.

Related Posts

jowad cyclon - jowad chakrivadal

cyclone Jawad : आसमानी संकट! आता येणार ‘जोवाड’ चक्रीवादळ? हवामान खात्याचा राज्यांना इशारा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

x
X