जिल्ह्यातील मावळ भागात अवकाळी पावसामुळं काढणीला आलेलं भात, ऊस या पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. पावसामुळं काढणीला आलेली पिके भुईसपाट झाली आहे, तर अनेक ठिकाणी पिकांवर रोग पडला आहे. पावसामुळं धुक्यामध्येही मोठ्याप्रमाणात वाढत झाली आहे.
पुणे – गेल्या दोन- तीन दिवसांपासून महाराष्ट्राच्या विविध भागात पावसानं हजेरी लावली आहे. कालरात्री शहराच्या काही भागात पावसानं अचानक जोरदार हजेरी लावल्यानं नागरिकांची धावपळ झाली. येत्या दोन दिवसात आणखी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. पुण्यासह कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात 23व 24 नोव्हेंबरला रोजी हलक्या पावसाची शक्यता आहे.
रब्बी पिकांचे नुकसान
नोव्हेंबरच्या मध्यानंतर पुणे जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात सातत्यानं पाऊस पडत आहेत. या पावसाचा जिह्यातील रब्बी पिकांना मोठा फटका बसून त्यांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील मावळ भागात अवकाळी पावसामुळं काढणीला आलेलं भात, ऊस या पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. पावसामुळं काढणीला आलेली पिके भुईसपाट झाली आहे, तर अनेक ठिकाणी पिकांवर रोग पडला आहे. पावसामुळं धुक्यामध्येही मोठ्याप्रमाणात वाढत झाली आहे. हाताशी आलेले पीक वाया गेल्यानं शेतकरी वर्ग अगदी रडकुंडीला आला आहे.
भाज्यांचे भाव घटले
ढगाळ हवामान, पावसामुळं अनेक शेतकऱ्यांनी वेळेपूर्वीच भाजीपाल्याची काढणी करून बाजारात विक्रीस आणला . परिणामी भाजीपाल्याची आवक वाढली. त्याच्या मोठा परिणाम हा भाजीपाल्यांच्या दरावर झाला आहे. भाज्यांची विक्री कवडीमोल भावानं होत असल्यानं शेतकऱ्यांना भाज्या बाजारात टाकून देण्याची वेळ आली आहे त्यामुळे बाजारात भाज्या पडून असल्याचे चित्र दिसत आहे ,ढगाळ वातावरणामुळे अर्थिक तोटा शेतकऱ्यांना बसला आहे. तर शहरामध्ये घाऊक व्यापारी व विक्रेत्यांकडून सर्वसामान्य नागरिकांना महाग दारात भाजीपाला विकला जात आहे.
हे पण वाचा
आरोग्यावर परिणाम
पहाटे थंडी, सकाळी कडक ऊन , दुपारी ढगाळ वातावरण तर रात्री पाऊस असे विचित्र वातावरण शहरात निर्माण झाले आहे. या वातावरणाचा गंभीर परिणाम नागरिकांच्या आरोग्य होत आहे. या वातावरणामुळं सर्दी , खोकला, ताप यांसह साथीच्या आजाराचे रुग्ण वाढले आहेत. याबरोबरच शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्येची नोंद रविवारी 95 होती .
गेल्या काही दिवसांपासून या रुग्ण संख्येत कमी-जास्त प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे. शहरातील बदलेले वातावरण साथीच्या आजारासह इतर आजारांसाठी ही पोषकठरत आहेत. त्यामुळं पुढील काही दिवस नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहनं महापालिकेच्या डॉक्टरांनी केलं आहे.