weather-alert-weather-forecast-monsoon-update

Weather Update: उत्तर-मध्य भारतात पावसाचा जोर वाढला; काय असेल महाराष्ट्राची स्थिती?

Weather Forecast: चालू सप्टेंबर महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता हवामान खात्याकडून (IMD) वर्तवण्यात आली होती.

हवामान अंदाज महाराष्ट्र २०२१: यावर्षी जून महिन्यात मान्सूननं महाराष्ट्रात दिमाखात आगमन (Monsoon in Maharashtra) केलं असलं तरी यावर्षी राज्यात अपेक्षित पावसानं हजेरी लावली नाही. मागील तीन महिन्यात राज्यात ऊन पावसाचा खेळ सुरू आहे. दरम्यान काही ठिकाणी अतिवृष्टी (Heavy Rainfall) सदृश्य पाऊस झाला आहे. पण यामुळे शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं आहे. चालू सप्टेंबर महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता हवामान खात्याकडून (IMD) वर्तवण्यात आली होती. हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यात सुरुवातीचे दोन आठवडे चांगला पाऊस झाला आहे.

पण आता राज्यातून पुन्हा एकदा मान्सून गायब झाला आहे. आज राज्यात जवळपास सर्वच ठिकाणी कोरड्या हवामानाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तर नागपूर आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यांना हवामान खात्यानं आज येलो अलर्ट जारी केला आहे. या ठिकाणी पुढील चोवीस तासात मुसधार पावसाची शक्यता असेल. दरम्यान याठिकाणी 30 ते 40 किमी प्रतितास वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात परतीचा मान्सून कधी येणार? व्हिडिओ बघा

गेल्या दोन आठवड्यापासून बंगालच्या उपसागरात आणि गुजरात परिसरात तयार झालेला हवेच्या कमी दाबाचा पट्टा सध्या उत्तरेकडे सरकला आहे. त्यामुळे सध्या मध्य भारत आणि उत्तर भारतात पावसाचा जोर वाढला आहे. परिणामी गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, ओडीसा आणि ईशान्यकडील बहुतांशी राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील अनेक जिल्ह्यांना आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. याठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

हेही वाचा-

दुसरीकडे, महाराष्ट्रात मात्र पुढील पाच दिवस पावसाचा कडकडीत लॉकडाऊन असणार आहेत. येत्या पाच दिवसात राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पण बहुतांशी ठिकाणी हवामान खात्याकडून कोणताही इशारा देण्यात आला नाही.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

x
X