पुणे : पोषक हवामानामुळे राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज आहे. आज (ता. १४) कोकणात बहुतांशी ठिकाणी तर उर्वरित राज्यात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, कोकणात मुसळधार तर राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.
मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे कायम असून, गुजरातच्या नालियापासून कमी दाब क्षेत्र, खांडवा, बालाघाट, रायपूर, संभाळपूर ते बंगालच्या उपसागरातील कमी तीव्रतेच्या वादळापर्यंत (डीप डिप्रेशन) सक्रिय आहे.
तर मॉन्सूनच्या आसाला समांतर असलेला कमी दाबाचा पट्टा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशापर्यंत ते डीप डिप्रेशनपर्यंत कायम आहे.
कमी तीव्रतेचे वादळ निवळणार
बंगालच्या उपसागरातील ठळक कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढून ओडिशाच्या किनारपट्टीलगत कमी तीव्रतेच्या वादळाची (डीप डिप्रेशन) निर्मिती झाली आहे.
हे पण वाचा :
- IMD Alert Today हवामान खात्याचा इशारा…5 डिसेंबरपर्यंत या भागात होणार मुसळधार पाऊस
- Maharashtra Weather Update | हवामान विभागाची मोठी अपडेट, ‘या’ भागांना गारपीटीचा इशारा पहा १ डिसेंबर चा हवामान अंदाज
- Havaman Andaj | कुठे होणार गारपीट आणि वादळी पाऊस? असा आहे राज्यातील हवामान अंदाज २८, २९, ३० नोव्हेंबर
- India Meteorological Department : पुढील ३-४ दिवस होणार मेघगर्जनेसह पाऊस तर या २५ जिल्ह्यांना यलो अलर्ट
- Skymate Weather Update | स्कायमेटचा नवीन हवामान अंदाज आला ! ‘या’ 11 राज्यात मुसळधार पाऊस
ही प्रणाली जमिनीवर आली असून, ती ओडिशाच्या किनाऱ्यावरील चांदबलीपासून पश्चिमेकडे २० किलोमीटर अंतरावर होती. छत्तीसगड मध्य प्रदेशकडे सरकत असलेल्या या प्रणालीची तीव्रता कमी होत आहे. तर गुजरात आणि परिसरावरही आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे.
राज्यात दोन दिवस पावसाचा जोर राहण्याची शक्यता असून, आज (ता. १४) कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.
मुसळधार पावसाचा
इशारा (ऑरेंज अलर्ट)
कोकण : पालघर.
मध्य महाराष्ट्र : नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर.
जोरदार पावसाचा इशारा (एलो अलर्ट)
कोकण : मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी.
मध्य महाराष्ट्र : धुळे, नंदूरबार.
मराठवाडा : जालना, परभणी, हिंगोली.
विदर्भ : अकोला, अमरावती.
विजांसह पावसाचा इशारा (एलो अलर्ट) ः विदर्भ : वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा.
माहिती स्रोत | प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई |
पत्ता | IMD Mumbai व IMD New Delhi |
दिनांक | 14 सप्टेंबर 2021 |
संकलन | हवामान अंदाज महाराष्ट्र २०२१ |