Weather Alert Heavy rains are expected in the area till November 10

Weather Alert: राज्यात दि. १० नोव्हेंबर पर्यंत या भागात पाऊस जोरदार हजेरी लावणार

Weather Update: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत दि. 4 ते 10 नोव्हेंबर पर्यंत हवामान अंदाज आणि जाणून घेणार आहोत आजचे व पुढील 3 दिवसांचे हवामान (Weather Update) महाराष्ट्रात कसे असेल याबाबत सविस्तर माहिती.

२५ ऑक्टोबरला संपूर्ण देशातून यंदाचा मान्सुनने माघार घेतली असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर केलं होत. दरम्यान श्रीलंका आणि तामिळनाडू किनाऱ्यालगतच्या (Weather Update) समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असल्याने पश्चिम किनारपट्टीवर पाऊसाची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली होती.

आजचे हवामान काय आहे?

यामुळे ४ ते १० नोब्हेंबर या कालावधीत राज्यातील काही भागात पाऊस पडेल असे भारतीय हवामान खात्याने सांगितले होते. आज पुन्हा पुढील 2 ते 3 दिवस राज्यात वीजांच्या गडगडाटासहीत काही ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने वर्तवले आहे. (Weather Update)

येत्या 5 दिवसांत अपेक्षित तीव्र हवामानाचा इशाराही प्रादेशिक हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (Weather Update)

लाईव्ह हवामान अंदाज

दरम्यान हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यात गेले दोन ते तीन दिवसात हालक्या स्वरुपाचा पाऊस सुरु आहे. यात कोकणाचा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही प्रदेशांचा समावेश आहे. या प्रदेशातील काही ठिकाणी गेली 4 दिवस मेघगर्जनेसह पाऊस सुरु आहे.

ऐन दिवाळीत ढगाळ वातावरण निर्माण झाले असून शेतकऱ्यांची भातकापणीसाठी धांदल उडाली आहे. या अंदाजानुसार राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात पाऊसाच्या हलक्या सरी सुरु आहेत. प्रादेशिक हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात वीजांच्या गडगडाटासहीत काही ठिकाणी पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

कोकणातील सिंधुदु्र्ग, रत्नागिर भागात पाऊस सुरु असून सांगली आणि कोल्हापुरातील काही भागात अधून मधून पावसाच्या हलक्या सरी सुरु आहेत. पुढील पाच दिवस वातावरण ढगाळ राहण्याचा अंदाजही हवामानाचा खात्याने वर्तवला आहे.

पंजाब डख हवामान अंदाज

हे पण वाचा –

नावभारतीय हवामान विभाग यांचा अंदाज
विभागप्रादेशिक हवामान केंद्र मुंबई
पत्ताIMD Mumbai व IMD New Delhi
दिनांक7 नोव्हेंबर 2021
फेसबुकदररोज हवामान अंदाजासाठी फेसबुक पेज लाईक करा
WhatsAppहवामान अंदाज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
संकलनआजचे हवामान महाराष्ट्र 2021

शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अंदाज मिळवण्यासाठी व पंजाब डख हवामान अंदाज whatsapp group साठी आपल्या वेबसाईटचे नोटिफिकेशन सुरू करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद!

Web Title: Weather Alert: Heavy rains are expected in the area till November 10

Related Posts

jowad cyclon - jowad chakrivadal

cyclone Jawad : आसमानी संकट! आता येणार ‘जोवाड’ चक्रीवादळ? हवामान खात्याचा राज्यांना इशारा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

x
X