Weather Update: दिवाळीचे इतके दिवस राज्यात जोरदार पावसाचा इशारा - हवामान अंदाज महाराष्ट्र 2024 - शेतकरी सेवार्थ.!
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग
. .
. .
Trending Now

Weather Update: दिवाळीचे इतके दिवस राज्यात जोरदार पावसाचा इशारा

Weather Forecast: श्रीलंका (Srilanka) आणि तामिळनाडूच्या किनारपट्टी (Coastal area of Tamil Nadu) परिसरात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र (low pressure area) निर्माण झालं आहे.

हवामान अंदाज डॉट इन: यंदाचे नैऋत्य मोसमी वारे माघारी परतल्यानंतर महाराष्ट्रासह देशात बहुतांशी ठिकाणी पावसाने (Rain in maharashtra) पूर्णपणे उघडीप घेतली आहे. दरम्यान दक्षिण आणि ईशान्य भारतात मात्र काही ठिकाणी जोरदार पाऊस (Heavy rainfall) कोसळला आहे. मान्सूनच्या परतीनंतर राज्यात पावसाने उसंत घेतली आहे.

पण आता राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक हवामान निर्माण होतं आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच जोरदार पावसाची हजेरी लागणार आहे. हवामान खात्याने 1 ते 3 नोव्हेंबर दरम्यान राज्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.

खरंतर, सध्या श्रीलंका (Srilanka) आणि तामिळनाडूच्या किनारपट्टी (Coastal area of Tamil Nadu) परिसरात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र (low pressure area) निर्माण झालं आहे. पुढील तीन ते चार दिवसांत हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र पश्चिम दिशेने पुढे सरकणार आहे. त्यामुळे देशात अनेक ठिकाणी येत्या आठवड्यात पावसाची स्थिती आहे.

हे पण वाचा -   Monsoon 2022 : कसा असेल यंदाचा पाऊस? 'स्कायमेट'चा नवीन अंदाज आला

तामिळनाडू आणि आसपासच्या परिसरात तर पुढील 48 तासांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील काही तासांत याठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस धडकण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीचीही शक्यता आहे. त्यामुळे संबंधित परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

हेही वाचा-

हे पण वाचा -   यंदा देशात 102% पाऊस होणार व सर्वसामान्य राहील मान्सून

दुसरीकडे, महाराष्ट्रात गेल्या दोन आठवड्यापासून पावसाने उघडीप घेतल्यानंतर, आता पावसासाठी पोषक हवामान तयार होतं आहे. श्रीलंका आणि कर्नाटक राज्याच्या किनारपट्टी परिसरात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र पश्चिम दिशेने पुढे सरकणार आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात महाराष्ट्रात देखील अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

विकेंडनंतर राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे. हवामान खात्याने 1 ते 3 नोव्हेंबर दरम्यान अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे.

हवामान खात्याने सोमवारी (1 नोव्हेंबर) सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. संबंधित जिल्ह्यात सोमवारी मेघरगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. मंगळवारी राज्यात हवामानाची स्थिती कायम राहणार असून अन्य भागात देखील तुरळक पावसाची शक्यता आहे.

हे पण वाचा -   पंजाब डख हवामान अंदाज - राज्यात 20 फेब्रुवारी पर्यंत थंडी व हे तीन दिवस राज्यात ढगाळ वातावरण!

बुधवारी मात्र हवामान खात्याने सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड या नऊ जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे.  दरम्यान पुणे, रायगड, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात देखील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

शेअर नक्की करा:

1 thought on “Weather Update: दिवाळीचे इतके दिवस राज्यात जोरदार पावसाचा इशारा”

Comments are closed.

Close Visit Havaman Andaj