Weather Update in Maharashtra हवामान अंदाज october

हुश्श …! आजपासून राज्यात पाऊस देणार उघडीप ; मान्सून परतीच्या प्रवासात । Weather Alert

Weather Update: राज्यात ऑकटोबर महिण्यातही परतीचा पाऊस धुमाकूळ घालतोच आहे. पण आता काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. यावर्षी हवामान विभागाने वर्तवलेले अंदाज खरे ठरत आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. त्यामुळे राज्यात उघडिपीची शक्यता आहे.

नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सूनने विदर्भाच्या काही भागातून निरोप घेतला. यातच राज्यात सुरु असलेला वादळी पाऊस विश्रांती घेणार असताना आजपासून म्हणजेच 12 तारखेपासून बहुतांशी भागात उघडीत मिळण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

weather forecast today

बंगालच्या उपसागरातील अंदमान समुद्राजवळ उद्या पर्यंत म्हणजेच 13 तारखेपर्यंत हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढून ठळक कमी दाबाचे क्षेत्र शुक्रवारपर्यंत ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनार्‍याकडे येण्याचे संकेत आहेत. अरबी समुद्रातील चक्राकार वाऱ्यांची स्थिती आणि त्यापासून बंगालच्या उपसागरात पर्यंत असलेला कमी दाबाचा पट्टा या स्थितीमुळे मध्य महाराष्ट्र आणि कोकणच्या काही भागात वीज आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

मान्सून महाराष्ट्रातून परतण्याच्या वाटेवर

राजस्थानातून 6 ऑक्‍टोबर रोजी परतीची वाटचाल सुरू केल्यानंतर नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास वेगाने सुरू आहे सोमवारी अकरा रोजी पूर्व भागातील गोंदिया, भंडारा, जिल्ह्याच्या काही भागातून मान्सून काढता पाय घेतल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

आज या भागात पावसाची शक्यता

दरम्यान आज दिनांक १२ ऑक्टोबर रोजी कोकण विभागातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना विजा आणि मेघगर्जनेसह पावसाचा इशारा या भागांना हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

हे वाचलंत का?

नावभारतीय हवामान विभाग यांचा अंदाज
विभागIndian Meterology Deoartment
पत्ताMumbai
दिनांक13 ऑक्टोबर 2021
फेसबुकदररोज हवामान अंदाजासाठी फेसबुक पेज लाईक करा
WhatsAppहवामान अंदाज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
संकलनआजचे हवामान महाराष्ट्र 2021

शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अंदाज मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद!

Related Posts

havaman andaj today live 48 hours

सावधान ! पुढील 48 तास महत्त्वाचे, वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, या जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा Weather Alert

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

x
X