हवामान ग्रुप जॉईन करा
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग
. .
. .
Trending Now

Monsoon Update : सध्या मान्सून कुठे आला, राज्यात मान्सून कधी येणार?, काय आहे IMD चा अंदाज

Monsoon and weather Update : भारतीय हवामान विभागाने मान्सून संदर्भात अपडेट माहिती दिली आहे. मान्सूनची प्रगती कुठपर्यंत आलीय अन् त्यानंतर राज्यात मान्सून कधी पोहचणार? हे हवामान विभागाने सांगितलंय.

मे महिन्यात तापमान सर्वत्र वाढले. राज्यातील अनेक जिल्ह्याच्या तापमानाने ४० अंशांचा वर पारा गाठला आहे. अनेक ठिकाणी कुठे हिट व्हेवचा ईशारा दिला आहे. त्याचवेळी राज्यात विदर्भात अवकाळ पाऊस आला आहे. उन्हामुळे जंगलातील वन्यप्राण्यांची पाण्याच्या शोधात भटकंती करावी लागत आहे. यामुळे आता मान्सून कधी येणार? याची वाट सर्वच जणांकडून पाहिली जात आहे. यासंदर्भात महत्वाची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.

कुठे आहे मान्सून?

मान्सून अंदमान-निकोबार बेटावरच रेंगाळला आहे. त्याचा वेगही मंदावला होता. सध्या नैऋत्य वाऱ्यांना गती नसून मौसमी वारे दक्षिण अंदमानच्या समुद्रातच आहे. पुढील दोन दिवसात मान्सून पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे.

हे पण वाचा -   Weather Update : फक्त थंडीच नाही तर पाऊसही येणार; हवामान विभागाचा अंदाज

चार दिवस उशीर होणार

विषुववृत्तीय अक्षांशांमध्ये दक्षिण हिंद महासागरावर चक्रीवादळ सरकत आहे. हे वादळ कमी होण्यास जवळपास एक आठवडा लागेल. हे वादळ मान्सूनला रोखणारे आहे. परंतु सध्या मान्सून अंदमान निकोबारकडे वेगाने वाटचाल करत आहे.  मान्सूनचे आगमन चार दिवस उशीराने होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. केरळमध्ये 1 जून रोजी दाखल होणारा मान्सून आता 4 जून रोजी दाखल होणार असल्याचा अंदाज आहे. यामुळे मुंबईत मान्सून 11 ते 12 जून दरम्यान येण्याची शक्यता आहे.

स्कायमेट अन् आयएमडीचा वेगवेगळा अंदाज

स्कायमेटकडून यंदाचा मान्सून सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाकडून यंदाचा मान्सून सर्वसाधारण राहण्याचा अंदाज जाहीर करण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाचा मे अखेरपर्यंत आणखी एक अंदाज येणार आहे. त्यात यंदाच्या पावसाची परिस्थिती स्पष्ट होणार आहे.

हे पण वाचा -   Maharashtra Monsoon Update - पुढील 4 दिवसात या भागात पून्हा मुसळधार पाऊस, पंजाब डख यांचा नवीन हवामान अंदाज

मे महिन्यात धरणाचा साठा वाढला

हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील विदर्भात मध्यंतरी अवकाळी पाऊस झाला. यामुळे अमरावती जिल्ह्यातील धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. परिणामी हतनूर धरणाच्या जलसाठ्यात गेल्या चार दिवसांत ३.२५ दलघमी वाढ झाली.

हतनूरच्या इतिहासात पहिल्यांदा मे महिन्याच्या रणरणत्या उन्हात जलसाठा घटण्याऐवजी सलग दोन वेळा वाढ झाली. यामुळे पाऊस लांबला तरी धरणातून पाणीपुरवठा अवलंबून असलेली ११० गावे, शहरे व औद्योगिक प्रकल्पांना जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत म्हणजेच पंधरा दिवस जास्तीचा दिलासा मिळेल.

आजचा हवामानाचा अंदाज

नावहवामान अंदाज महाराष्ट्र राज्य
विभागभारतीय हवामान शास्त्र विभाग
पत्ताहवामान विभाग – IMD
दिनांक25 मे 2023
संकलनआजचे हवामान महाराष्ट्र 2023

पंजाब डख हवामान अंदाज Whatsapp Group

मित्रांनो दररोज जिल्हानिहाय हवामान अंदाज मिळवण्यासाठी आणि त्याचबरोबर पंजाब डख हवामान अंदाज व हवामान विभागाचे अपडेट निशुल्क मिळवण्यासाठी खालील कोपऱ्यात येणाऱ्या बटनावर क्लिक करा.

हे पण वाचा -   Weather Alert | विदर्भात आजपासून पुढील २ दिवस वादळी पावसासह गारपीटीचा अंदाज, या जिल्ह्यांना हवामान विभागाचा इशारा
शेअर नक्की करा:
Close Visit Havaman Andaj