हवामान ग्रुप जॉईन करा
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग
. .
. .
Trending Now

Panjab Dakh Havaman Andaj | पंजाब डख यांनी दिला ६ सप्टेंबर पर्यंतचा हवामान अंदाज, इथे उघडीप तर या भागात कोसळणार

Panjabrao Dakh : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने (Rain) उघडीप दिली आहे. मात्र आज सकाळपासून राजधानी मुंबईत हलक्या स्वरूपाचा पाऊस (Monsoon) बरसत आहे. आज सकाळपासून मुंबई आणि ठाणे परिसरात पाऊस (Monsoon News) कोसळत आहे.

दरम्यान राज्यातील इतर जिल्ह्यात मात्र पावसाची उघडीप बघायला मिळत आहे. मात्र असे असले तरी भारतीय हवामान विभागाने (IMD) आज विदर्भासाठी येलो ॲलर्ट जारी केला आहे. मित्रांनो खरे पाहता जुलै महिन्यात आणि ऑगस्ट महिन्यातील पहिल्या दोन आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे (Maharashtra Rain) खरीप हंगामातील पिकांची नासाडी झाली होती.

त्यापासून बचावलेले पिक आता पावसाअभावी सुखत असल्याचे दृश्य देखील बघायला मिळत आहे. यामुळे बहुतांशी शेतकरी बांधव (Farmer) आता पावसाची वाट पाहत असल्याचे चित्र आहे. दरम्यान आपल्या हवामान अंदाजासाठी ओळखल्या जाणाऱ्या पंजाब रावांचा देखील हवामान अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaj) आला आहे. पंजाबराव (Panjabrao Dakh News) यांनी वर्तवलेल्या आपल्या 6 सप्टेंबर पर्यंतच्या सुधारित हवामान अंदाज नुसार, आज राज्यात सर्वत्र पावसाची उघडीप राहणार आहे.

हे पण वाचा -   पंजाब डख हवामान अंदाज : दिवाळीच्या दिवसात इथे मुसळधार?️ 4 ते 8 नोव्हेंबर हवामान अंदाज | punjab dakh

मात्र उद्या 29 तारखेपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. त्यांनी वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार 29 तारखेपासून ते 6 सप्टेंबर पर्यंत राज्यात सर्वत्र पावसाची शक्यता आहे. हा पाऊस पूर्व विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश जवळपास सर्वच विभागात राहणार आहे.

या जिल्ह्यात कोसळणार धो-धो पाऊस

पंजाबराव यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, द्राक्षे पंढरी नाशिक, अहमदनगर, सातारा आणि सांगली या दोन जिल्ह्यात 31 तारखेपासून ते 5 सप्टेंबर पर्यंत पाऊस कोसळणार आहे. तसेच खानदेश मधील धुळे नंदुरबार जळगाव या जिल्ह्यात देखील पावसाची शक्यता आहे.

याशिवाय बुलढाणा, अमरावती, अकोला, जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड या जिल्ह्यात देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे. एकंदरीत गणरायाच्या आगमनाबरोबरचं राज्यात गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून गायब झालेला मान्सूनचा पाऊस पुन्हा येणार असल्याचे चित्र आहे. यामुळे पावसाअभावी ज्या शेतकऱ्यांची पिके करपत होती त्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

हे पण वाचा -   Maharashtra Monsoon Update: महाराष्ट्राच्या ‘या’ भागात पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज काय? जाणून घ्या…

Panjab Dakh Havaman Andaj Till 6th of September | पंजाब डंख यांनी दिला ६ सप्टेंबर पर्यंतचा हवामान अंदाज, इथे उघडीप तर या भागात कोसळणार

शेअर नक्की करा:
Close Visit Havaman Andaj