नमस्कार शेतकरी मित्रांनो, हवामान अंदाज महाराष्ट्र 2022 मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण एक महत्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे. मान्सून २०२२ अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर एक अफवा हि मोठ्या प्रमाणात पसरवल्या जात आहे. तर ती अफवा म्हणजे यंदा मान्सून दहा दिवस आधीच येणार अशा बातम्या हवामान खात्याच्या हवाल्यातून प्रसिद्धकेल्या जात आहे.
अश्या या खोट्या बातम्यांमुळे पावसाळ्यावर अवलंबून असणाऱया कृषि व अन्य उद्योगातील लोकांनी जय्यत तयारी केली. परंतु मान्सूनबाबतच्या या बातम्या खोटय़ा असल्याचे हवामान तज्ञांनीच स्पष्ट केले आहे. इतकेच नव्हे तर हवामान खात्याकडून अशी माहितीच दिली गेली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
ज्येष्ठ हवामानतज्ञ कृष्णानंद होशाळीकर यांनी ‘देशात मान्सून दाखल होण्यासंबंधीच्या काही दिशाभूल करणाऱया बातम्या अनेक जण पसरवत आहेत. कृपया त्याकडे दुर्लक्ष करावे. अशा खोटय़ा बातम्यांमुळे अनेकांचे नुकसानच होईल, असे ट्विट केले आहे.
मान्सून आगमनापूर्वी शेतकरी व अन्य घटकांची कामे जोमाने सुरू होतात. मान्सून लवकर येण्याच्या बातमीने त्यांच्यात संभ्रम निर्माण झाला आहे. तो संभ्रम हवामान तज्ञांच्या या स्पष्टीकरणामुळे दूर झाला आहे.
हे पण वाचा –
- NEW आजचे सोयाबिन बाजार भाव 26 सप्टेंबर 2024 Soyabin Bajar bhav
- राज्यात पुढील २ दिवस मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागांत धो-धो बरसणार, कसं असेल हवामान?
- Panjabrao Dakh Havaman Andaj | राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार; या जिल्ह्यांमध्ये जोरदार बरसणार
- Aaj che Havaman (आजचे हवामान): राज्यात पावसाचा जोर वाढणार! ‘या’ ठिकाणी होणार मुसळधार, IMD कडून यलो अलर्ट
- Maharashtra Weather August 2024 । महाराष्ट्रातील या 6 जिल्ह्यांमध्ये ‘यलो अलर्ट’ ; विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा
- IMD चा उद्याचा जिल्हानिहाय हवामान अंदाज; या १ १ जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज । Monsoon Alert Maharashtra
नाव | भारतीय हवामान विभाग यांचा अंदाज |
---|---|
विभाग | प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई |
पत्ता | IMD Mumbai |
फेसबुक | दररोज हवामान अंदाजासाठी फेसबुक पेज लाईक करा |
हवामान अंदाज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा | |
संकलन | आजचे हवामान महाराष्ट्र 2022 |
पंजाब डख हवामान अंदाज Whatsapp Group
शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अंदाज मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद!