Weather Alerts: बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे (Low pressure area) पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात (IMD alerts) आली आहे.
आजचे हवामान अंदाज : काल मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्राला मुसळधार पावसानं अक्षरश: झोडपून (Heavy rainfall in maharashtra) काढलं आहे. रात्रभर कोसळलेल्या पावसामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून धरणं ओसंडून वाहत आहे. यानंतर आता सप्टेंबर महिन्याच्या शेवटी पुन्हा एकदा राज्यात पावसाचा जोर वाढत असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे (Low pressure area) पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात (IMD alerts) आली आहे.
हे पण वाचा – म्युच्युअल फंड म्हणजे काय?
मागील काही दिवसांपासून बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र कार्यरत आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी वरूणराजा बरसला आहे. तर येत्या 12 तासात बंगालच्या उपसागरातील हवेच्या कमी दाबाचा पट्टा आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भासहीत मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर अधिक असणार असल्याची माहिती हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुते यांनी दिली आहे.
पुढील 48 तासात हवेच्या कमी दाबाचा पट्टा ओडीसाच्या दिशेने सरकणार आहे. त्यामुळे येत्या पाच दिवसांत राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह वेगवान वाऱ्याच्या साथीने अतिवृष्टी सदृश्य पावसाची शक्यता आहे. रविवारपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे.
हे पण वाचा
हेही वाचा-
- NEW आजचे सोयाबिन बाजार भाव 26 सप्टेंबर 2024 Soyabin Bajar bhav
- राज्यात पुढील २ दिवस मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागांत धो-धो बरसणार, कसं असेल हवामान?
- Panjabrao Dakh Havaman Andaj | राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार; या जिल्ह्यांमध्ये जोरदार बरसणार
- Aaj che Havaman (आजचे हवामान): राज्यात पावसाचा जोर वाढणार! ‘या’ ठिकाणी होणार मुसळधार, IMD कडून यलो अलर्ट
- Maharashtra Weather August 2024 । महाराष्ट्रातील या 6 जिल्ह्यांमध्ये ‘यलो अलर्ट’ ; विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा
आज कोकण आणि पूर्व विदर्भातील काही जिल्हे वगळता राज्यात सर्वत्र विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज पुणे, नाशिक, कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासह अहमदनग आणि संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट (yellow alerts) जारी केला आहे. पुढील पाच दिवस कमी अधिक फराकाने हीच स्थिती कायम राहणार आहे. पुण्याला आजपासून पुढील पाचही दिवस येलो अलर्ट देण्यात आला आहे. याठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
माहिती स्रोत | प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई |
पत्ता | IMD Mumbai व IMD New Delhi |
दिनांक | 25 सप्टेंबर 2021 |
संकलन | हवामान अंदाज महाराष्ट्र २०२१ |
तर मित्रांनो हा होता हवामानाचा अंदाज पुढील तीन ते चार दिवसासाठी चा दररोज हवामान अंदाज व्हॉट्सऍप ग्रुप वर मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या ग्रुप ला अवश्य जॉईन करा आणि ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद.