Weather Alert: येत्या 48 तासात राज्यातील बहुतांश भागात जोरदार पावसाची शक्यता

Weather Update: नमस्कार हवामान अंदाज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे दक्षिणेकडील राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे त्याचबरोबर राज्यातील सुद्धा अनेक भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागातर्फे देण्यात आलेला आहे. तर पाहूयात यासंदर्भात सविस्तर बातमी

आजचे हवामान अंदाज 2021 live

राजस्थान व पश्चिम बंगालच्या परिसरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून यामुळे उत्तर भारतातील मान्सून चा आज आता दक्षिणेत आला असून, यामुळे राज्यात पुढील दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

हवामान उद्या सकाळी

तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाची शक्यता असून आज विदर्भातील गोंदिया, गडचिरोली तर मराठवाड्यातील लातूर, बीड, उस्मानाबाद, नांदेड तसेच कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग तसेच उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्‍यता असून मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर व विदर्भातील वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्‍यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

हे पण वाचा-

पंजाब डख हवामान अंदाज । Panjab Dakh Weather Forecast

माहिती स्रोतप्रादेशिक हवामान केंद्र मुंबई
पत्ताIMD Mumbai व IMD New Delhi
दिनांक21 सप्टेंबर 2021
संकलनहवामान अंदाज महाराष्ट्र २०२१

शेतकरी मित्रांनो हा होता पुढील 48 तासांचा हवामान अंदाज. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून अंदाज पाहताय कमेंट मध्ये नक्की सांगा आणि दररोज व्हाट्सअप वर हवामान अंदाज मिळवण्यासाठी आपल्या ग्रुपला अवश्य जॉईन व्हा व ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद.

Close Visit Havaman Andaj

Scroll to Top