Monsoon Update: सावधान…! आज राज्यात ‘या’ विभागात अतिवृष्टी होणारं, पंजाबरावांचा अंदाज - हवामान अंदाज महाराष्ट्र 2023 - शेतकरी सेवार्थ.!
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग
. .
. .
Trending Now

Monsoon Update: सावधान…! आज राज्यात ‘या’ विभागात अतिवृष्टी होणारं, पंजाबरावांचा अंदाज

Monsoon Update: भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रात पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस (Rain) कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. महाराष्ट्रातील विदर्भात पुढील पाच दिवस पावसाची (Monsoon) तीव्रता अधिक राहणार असून विदर्भासाठी भारतीय हवामान विभागाने रेड तसेच ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

आज विदर्भातील गडचिरोली चंद्रपूर आणि गोंदिया या तीन जिल्ह्यात जोरदार पावसाचे (Monsoon News) वातावरण राहणार आहे. आज तसेच उद्या विदर्भातील गोंदिया, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यात एक-दोन ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून या संदर्भात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभागाच्या मते, पुढील पाच दिवस नागपूर, भंडारा, अकोला, बुलढाणा, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा जिल्ह्यात एक-दोन ठिकाणी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो. निश्चितच पुढील काही दिवस विदर्भ वासियांना काळजी घ्यावी लागणार आहे. भारतीय हवामान विभागाने देखील लोकांना सतर्क राहण्याचा इशारा यावेळी दिला आहे.

दरम्यान, आपल्या हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रात नावाजलेल नाव म्हणजेच पंजाबराव डख यांचा देखील हवामान अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaj) आता सार्वजनिक करण्यात आला आहे. पंजाब रावांनी वर्तवलेल्या आपल्या हवामान अंदाजानुसार, राज्यात 11 ऑगस्टपर्यंत सर्वत्र पावसाचे वातावरण राहणार आहे. राज्यात सर्वत्र पाऊस पडेल मात्र हा पाऊस भाग बदलत पडणार असल्याचे डख (Panjabrao Dakh) यांनी नमूद केले आहे.

9,10 आणि 11 ऑगस्ट रोजी राज्यात सर्वत्र भाग बदलत पाऊस पडणार आहे. पंजाबरावांच्या (Panjabrao Dakh News) मते, या दरम्यान विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. अशा परिस्थितीत या कालावधीत शेतकरी बांधवांनी आपली, आपल्या पशुधनाची विशेष काळजी घ्यावी असा सल्ला पंजाबराव यांनी यावेळी शेतकरी बांधवांना दिला आहे. मित्रांनो पंजाबराव यांनी वर्तवलेला हवामान अंदाज अगदी तंतोतंत खरा ठरला असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

जस की पंजाबरावांनी 7-8 हे दोन दिवस उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टी होणार असल्याचे भाकीत वर्तवले होते आणि हा अंदाज अगदी तंतोतंत खरा ठरला असून उत्तरमहाराष्ट्रातील अनेक भागात अतिवृष्टी सारखा पाऊस काल बघायला मिळाला. निश्चितच जुलै महिन्यात ज्या पद्धतीने पावसाने थैमान माजवलं होतं अगदी तसेच थैमान ऑगस्ट मध्ये देखील बघायला मिळणार आहे.

त्यामुळे शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान होणार असल्याचे सांगितले जात आहे. खरीप हंगामातील जवळपास सर्वच पिकांना या मुसळधार पावसाचा फटका बसणार असून पीक सडण्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे. यामुळे शेतकरी बांधवांना हजारो रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.

शेअर नक्की करा:
Close Visit Havaman Andaj