Weather Update : महाराष्ट्र थंडीने गारठला! 'या' जिल्ह्यात पावसाचा अंदाज, राज्यभरात गुलाबी थंडीची चाहूल - हवामान अंदाज महाराष्ट्र 2023 - शेतकरी सेवार्थ.!
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग
. .
. .
Trending Now

Weather Update : महाराष्ट्र थंडीने गारठला! ‘या’ जिल्ह्यात पावसाचा अंदाज, राज्यभरात गुलाबी थंडीची चाहूल

Maharashtra Weather Update : नमस्कार शेतकरी मित्रांनो हवामान अंदाज महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत आहे आज दिनांक 4 नोव्हेंबर 2023 आणि आपण जाणून घेणार आहोत पुढील आठवडाभराचा संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज. राज्यात गुलाबी थंडी (Cold Weather) ची चाहूल लागली असून सर्वत्र गारठा (Winter) वाढला आहे. वाढत्या तापमानापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, राज्यात (Maharashtra) काही भागात पावसाची शक्यता हवामान विभाग (IMD) ने वर्तवली आहे.

Maharashtra Weather Update

नोव्हेंबर (November) महिन्यात गारठा वाढला असली तरी, आणखी पारा घसरणार आहे. राज्यात सिंधुदुर्ग (Sindhudurg) आणि कोल्हापूर (Kolhapur) त पावसाची शक्यता (Rain Alert) हवामान विभागाने वर्तवली आहे. या भागात मेघगर्जनेसह पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. यासोबत गोव्यातही (Goa) पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

हे पण वाचा -   राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार । हवामान अंदाज

राज्यासह देशात पारा घसरला

अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यासह देशाच्या काही भागात पाऊस बरसणार आहे. केरळ (Karala), तामिळनाडू (Tamil Nadu) आणि कर्नाटक (Karnataka) मध्ये जोरदार पावसाची शक्यता (Rainfall Prediction) आहे. गोव्यातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

तर, राज्यातील इतर काही भागात तापमान वाढण्याचा आयएमडीचा अंदाज आहे. दिल्लीतही अनेक भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मुंबईत (Mumbai Temperature) पहाटे तापमान कमी राहणार असून दुपारी तापमान वाढण्याची शक्यता आहे.

‘या’ भागात पावसाचा अंदाज

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण भारतातील तामिळनाडू आणि केरळमध्ये पुढील 24 तासात जोरदार पावसाची शक्यता आहे. पुद्दुचेरीमध्येही पाऊस पडण्याचा अंदाज आहे. पुढील आठवडाभर अंदमान निकोबार बेटांवर पाऊस पडण्याची शक्यता आहे. कराईकल आणि लक्षद्वीपमध्येही येत्या काही दिवसांत पाऊस पडेल.

हे पण वाचा -   पुढील दोन दिवस पुण्यात पाऊस, हवामान खात्याची माहिती; अवकाळी पावसाचा रब्बी पिकांना फटका

पर्वतीय भागात बर्फवृष्टी

याशिवाय हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर आणि उत्तराखंडसह पर्वतीय भागात बर्फवृष्टी सुरूच राहणार आहे. जम्मू-काश्मीरच्या गिलगिट, बाल्टिस्तान आणि मुझफ्फराबादमध्ये बर्फवृष्टी होईल. त्यामुळे उत्तर भारतात थंडी वाढण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्ये तापमान वाढ कायम राहणार आहे.

उत्तर भारतात पारा घसरणार

भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार, उत्तरकाशी, चमोली, रुद्रप्रयाग, चमोली, बागेश्वर आणि पिथौरागढमध्ये हलका पाऊस आणि हिमवर्षाव होण्याची शक्यता वर्तवली आहे. याच्या परिणामी संपूर्ण पूर्व आणि उत्तर भारतात पारा घसरून थंडी वाढणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे. त्यासोबतच बिहार, उत्तर प्रदेश आणि झारखंडवर याचा परिणाम होईल आणि गारठा वाढण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

हे पण वाचा -   पंजाब डख लाईव्ह ll panjab dakh hawaman andaj ll हवामान अंदाज ll panjab dakh hawaman andaj today | Weather Update

शेतकरी मित्रांनो हा माहिती पूर्ण लेख आवडल्यास इतर शेतकऱ्यांना आवश्यक शेअर करा आणि आपल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करायला विसरू नका तिथे तुम्हाला दररोज हवामान अंदाज बाजार भाव आणि शेती विषयी योजना तसेच कृषी सल्ला याबद्दल अपडेट दिल्या जाईल.

शेअर नक्की करा:
Close Visit Havaman Andaj