Maharashtra Rain: पुढील 2 दिवस विदर्भातील ३ जिल्ह्यांना येलो अलर्ट; 15,16 फेब्रुवारी हवामान अंदाज राज्याच्या इतर भागात हवामान कसे राहील? बघा - हवामान अंदाज महाराष्ट्र 2024 - शेतकरी सेवार्थ.!
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग
. .
. .
Trending Now

Maharashtra Rain: पुढील 2 दिवस विदर्भातील ३ जिल्ह्यांना येलो अलर्ट; 15,16 फेब्रुवारी हवामान अंदाज राज्याच्या इतर भागात हवामान कसे राहील? बघा

राज्यात (Maharashtra) सध्या थंडी गायब झाली असून काही भागात ढगाळ वातावरण तर काही भागात उन्हाचे चटके जाणवत आहेत. पुणे (Pune) हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांत पुढील दोन दिवस हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वाऱ्याची चक्रिय स्थिती दक्षिण गुजरात, मराठवाडा आणि विदर्भावर असल्याने या भागात पावसाची शक्यता आहे. पुढील 2 दिवस विदर्भातील ३ जिल्ह्यांना येलो अलर्ट हवामान विभागाचा इशारा 15,16 फेब्रुवारी हवामान अंदाज

हवामान विभागाने आज विदर्भातील तीन जिल्ह्यांना हलक्या पावसाचा येलो अलर्ट दिला. विदर्भातील काही ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. भंडारा, गोंदीया, चंद्रपूर आणि नागपूर या चार जिल्ह्यांना हवामान विभागाने हलक्या पावसाचा येलो अलर्ट दिला.

पुढील काही दिवस विदर्भ, मराठवाड्यात पावसाची शक्यता

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील चार ते पाच दिवस राज्यातील कमाल-किमान तापमानात फारसा बदल होणार नाही. मात्र राज्याच्या काही भागात पहाटे धुके पडण्याची शक्यता आहे. शनिवारी, 17 फेब्रुवारीला एक पश्चिमी थंड वाऱ्याचा प्रवाह हिमालयीन भागात सक्रिय होण्याचा अंदाज आहे. त्याचा परिणाम म्हणून विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात पुढील दोन दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे राहील.

हे पण वाचा -   Maharashtra Rain Update : मराठवाड्यासह राज्यात "इथे" विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस

काही भागात गारपीट

हवामान विभागाच्या माहितीनुसार, हिमालयीन भागात थंड वाऱ्याचा प्रवाह सक्रिय होत असल्याचा परिणाम म्हणून विदर्भ, मध्य प्रदेश आणि ओडिशाच्या काही भागांत पुढील दोन दिवस हलक्या पावसाची शक्यता आहे. छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या काही भागात तापमानात घट होण्याची शक्यता आहे, यामुळे गारपीट होण्याचा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

शेती, फळबागांवर परिणाम

महाराष्ट्रातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे. कुठे थंडीचा कडाका वाढत आहे, तर कुठे ढगाळ वातावरण जाणवत आहे. तर काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, सातत्याने बदलणाऱ्या या वातावरणामुळे शेती, फळबागांवरसुद्धा त्याचा परिणाम हात आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान यात होत असून नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम हाेत आहे. खोकला, सर्दी यासारखे आजारदेखील बळावले आहेत

हे पण वाचा -   Rain in Maharashtra: आगामी दोन दिवस अवकाळी पावसाचे…! राज्यात कुठे-कुठे बरसणार पाऊस; याचा शेतकऱ्यांवर काय होणार परिणाम
शेअर नक्की करा:
Close Visit Havaman Andaj