हवामान ग्रुप जॉईन करा
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग
. .
. .
Trending Now

Manikrao Khule Havaman Andaj : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक! अवकाळी वातावरणापासून मिळणार सुटका, वाचा आजचे व उद्याचा हवामान अंदाज 

Havaman Andaj Today : उन्हाची तीव्रता वाढल्याने राज्यात होरपळ वाढली आहे. वादळी पावसाने उघडीप दिली असून, उकाडा कायम आहे. (Manikrao Khule Havaman Andaj) आज (ता.२९) कोकणात उष्ण लाटेचा इशारा, तर विदर्भात वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) कायम आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविला आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध भागात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना हैराण केले आहे. मात्र आता शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून आजअवकाळी वातावरणाचा शेवटचा दिवस असुन उद्या मंगळवार दि.३० एप्रिलपासून संपूर्ण महाराष्ट्रात वीजा, वारा, गारा व अवकाळी पावसासारख्या वातावरणा पासून सुटका मिळेल, असे संकेत जेष्ठ निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केले आहेत.

मध्य-महाराष्ट्र व मराठवाड्यातील रात्रीचा उकाडा –

मात्र उद्या मंगळवार दि. ३० एप्रिलपासून खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर अशा संपूर्ण १० जिल्ह्यात तसेच मराठवाड्यातील ८ जिल्ह्यातील सर्व नव्हे परंतु काही भागात, पहाटेचे किमान तापमान सरासरीपेक्षा ४ तर दुपारचे कमाल तापमान सरासरीपेक्षा २ डिग्री से. ग्रेड ने वाढल्यामुळे दिवसाची उष्णतेबरोबर रात्रीच्या उकाड्यातही कमालीची वाढ होवून काहिली जाणवणार आहे. विशेषतः रात्रीचा उकाडा अधिक जाणवेल.

हे पण वाचा -   Punjab Dakh Havaman Andaj: बापरे! मे महिन्यात या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस

Manikrao Khule Havaman Andaj

दक्षिण मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर ह्या पाच जिल्ह्यात ह्या उष्णतेचा परिणाम अधिक जाणवेल. येत्या मे महिन्यातील पहिल्या आठवड्यात ह्या दोन्हीही तापमानात मात्र हळूहळू वाढीचीच शक्यता असुन जन-जीवनाला ह्या असह्य उष्णता व उकाड्याशीच चांगलाच सामना करावा लागेल, असे वाटते.

पूर्व विदर्भापासून मध्य महाराष्ट्र, कर्नाटक ते उत्तर केरळपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. राज्याच्या विविध भागांत ढगाळ हवामान होत आहे. आज (ता. २९) विदर्भात वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज आहे.

विदर्भ – 

विदर्भातील दोन्हीही तापमाने सध्या सरासरी इतकी असल्यामुळे तेथे सर्व सामान्य उष्णता जाणवेल. 

हे पण वाचा -   Weather forecast Book Review: हवामान दूत लेखक डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी

कोकणातील उष्णतेची लाट 

मुंबई शहर तसेच उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग अश्या ७ जिल्ह्यात सध्या चालु असलेल्या उष्णतेच्या लाटेचा तसेच रात्रीच्या उकाड्याचा प्रभाव कायम असुन तेथील जनजीवनाला येत्या मे महिन्यातील पहिल्या आठवड्यातही ह्या असह्य काहिलीचा सामना करावा लागेल, असे वाटते. 

कशामुळे उष्णतेचे वातावरण टिकून

महाराष्ट्राच्या पश्चिम कि. पट्टीवर अरबी समुद्रात हंगामी प्रत्यावर्ती वाऱ्यामुळे वायव्येकडून येणारी उष्णता व तयार झालेला हवेचा उच्चं दाब आणि त्यातून स्थिरावलेले वेगवान वारा (वहन) ह्यामुळे कोकणात उष्णतेची लाट टिकून आहे. मध्य महाराष्ट्रात तयार झालेल्या दक्षिणोत्तर वारा खंडितता प्रणालीतून तयार झालेला हवेच्या कमी दाबाचा द्रोणीय आस व त्यामुळे शांत वारा व वाढलेले पहाटेचे किमान तापमानामुळे रात्रीच्या  उकाड्यात वाढ झालेली आहे.

रविवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांत वाशीम येथे राज्यातील उच्चांकी ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर कमाल तापमानात वाढ झाल्याने चंद्रपूर, ब्रह्मपुरी, नांदेड, मालेगाव, सोलापूर, गडचिरोली येथे पारा ४२ अंशांवर पोचला आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी तापमान चाळिशी पार आहे. आज (ता. २९) मुंबईसह कोकणात उष्ण लाटेचा इशारा कायम आहे. तर उर्वरित राज्यात उन्हाचा चटका, उकाडा वाढण्याची शक्यता आहे.

हे पण वाचा -   Rain in Maharashtra | राज्यात ‘या’ तारखेपर्यंत पाऊस कायम, तर ‘या’ जिल्ह्यात होणार मुसळधार पाऊस! Panjab Dakh यांचा नवीन Havaman Andaj आला

रविवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३९.९, धुळे ४०.०, जळगाव ४१.५, कोल्हापूर ३८.७, महाबळेश्वर ३२.९, मालेगाव ४२.०, नाशिक ४०.१, निफाड ४०.०, सांगली ४०.५, सातारा ३९.१, सोलापूर ४२.०, सांताक्रूझ ३६.६, डहाणू ३४.६, रत्नागिरी ३४.७,

छत्रपती संभाजीनगर ३९.२, बीड ४१.२, नांदेड ४२.४, धाराशिव ४१.८, परभणी ४१.५, अकोला ४१.४, अमरावती ४०.०, बुलडाणा ३९.०, ब्रह्मपुरी ४२.७, चंद्रपूर ४२.८, गडचिरोली ४२.०, गोंदिया ३७.६, नागपूर ३९.७, वर्धा ४१.४, वाशीम ४३.०, यवतमाळ ४१.७.

-उष्ण लाटेचा इशारा (येलो अलर्ट) :

पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

– वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

अमरावती, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.

४२ अंशांपेक्षा अधिक कमाल तापमान असलेली ठिकाणे :

वाशीम ४३, चंद्रपूर ४२.८, ब्रह्मपुरी ४२.७, नांदेड ४२.४, मालेगाव ४२, सोलापूर ४२, गडचिरोली ४२.

लेखक : माणिकराव खुळे, जेष्ठ निवृत्त हवामान तज्ञ आयएमडी पुणे 

शेअर नक्की करा:
Close Visit Havaman Andaj