Maharashtra Rain Update: पूढील ३ दिवसांचा हवामान अंदाज; या भागात मुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra Weather Update: राज्याच्या विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पुढील तीन चार दिवस मान्सून सक्रिय राहणार आहे, अशी माहिती के.एस.होसळीकर यांनी ट्विट करत दिली आहे.

K.S. Hosalikar Twitter

Havaman Andaj Today dolon

मुसळधार पावसाने अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक गावांना जोडणारे रस्त्यावर पाणी आल्याने याचा वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मुंबई, ठाणे परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गेली 2 दिवस पुणे, कोल्हापूर, मुंबई, रायगड, रत्नागिरी,नंदूरबार, वर्धा, अहमदनगर, बुलडाणा या भागात पावसाने चांगलेच झोडपले आहे. तर आजही राज्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रासह कोकणालाही ऑरेज् अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर नाशिक आणि पालघर जिल्ह्यांनाही ऑरेज अलर्ट देण्यात आला आहे.

Havaman Andaj Today jpg 2336 1663127441

पुढील 3 ते 4 दिवस मान्सून सक्रिय

पुढील 3 ते 4 दिवस राज्यात मान्सून सक्रिय राहणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात याचा मोठा परिणाम होऊ शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. रायगडमध्ये आज आणि उदया (गुरुवारी) ऑरेंज अलर्ट, तर रत्नागिरीमध्ये आज (बुधवारी) ऑरेंज अलर्ट आहे. त्यानंतर दोन्ही जिल्ह्यांमध्ये शनिवारपर्यंत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र सिंधुदुर्गात शुक्रवारपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज दिसून येत आहे.

ढगाळ वातावरणामुळे चिंता

सतत ढगाळ वातावरण घोंगावत असल्याने शेतकऱ्यांतून चिंता व्यक्त होत आहे. पाऊस झाल्यानंतर पुरेसा सूर्यप्रकाश पडण्याची गरज आहे. मात्र, सतत ढगांचे घोंगण असल्याने शेंग अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाऊस व ऊन पडल्यास पिकांच्या वाढीसाठी व शेंगा भरण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होते. मात्र, एकदा पाऊस सुरू झाला की आठ दिवसांपेक्षा अधिक काळ पुरेसे सूर्यदर्शन होत नाही. यामुळे उत्पन्नाला फटका बसतो.

परतीचा पाऊस सुरू

औरंगाबाद एमजीएम अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक ​​श्रीनिवास औंधकर म्हणाले की, परतीच्या पावसाला सुरूवात झाली असून काही दिवस तीव्रता अधिक राहिल. त्यानंतर हळूहळू तीव्रता कमी होईल. परतीचा पाऊस सर्वच जिल्ह्यात किंवा भागात पडण्याची शक्यता कमी आहे. जेथे अनुकूल वातावरण होईल तेथे बरसात होईल.

इतर सर्व हवामान अंदाज

तुमच्या जिल्ह्याचा हवामान अंदाज पहा

नावपंजाब डख (Panjab Dakh Patil Weather Forecast)
विभागपंजाबराव डख पाटील हवामान अंदाज
गावमु.पो .गुगळी धामणगाव  ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा)
दिनांक14 सप्टेंबर 2022
फेसबुकदररोज हवामान अंदाजासाठी फेसबुक पेज लाईक करा
WhatsAppहवामान अंदाज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
संकलनआजचे हवामान महाराष्ट्र 2022

पंजाब डख हवामान अंदाज WhatsApp Group

शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अभ्यासक Panjabrao Dakh Patil Weather Forecast यांचा अंदाज मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटचे नोटिफिकेशन सुरू करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद

Close Visit Havaman Andaj

Scroll to Top