× WhatsApp Icon

शासकीय माहिती आणि योजना WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा!

जॉईन करा
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग

Maharashtra Weather News | जोरदार पावसामुळे इथे येलो अलर्ट, तर ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाचा इशारा

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn
weather 12

Maharashtra Rain News : महाराष्ट्रात यंदा ऐन उन्हाळ्यात अवकाळी पाऊस झाला. अशात आता पुन्हा एकदा हवामान खात्याकडून राज्याला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची काळजी घ्यावी अशा सूचना हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत. openweathermap

weather news : राज्यात गेल्या महिन्यापासून अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. अशात पुन्हा एकदा हवामान खात्याकडून राज्यासाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात पुढील ४ ते ५ दिवसांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून यादरम्यान वादळी वाऱ्यासह ढगांचा गडगडाट आणि मुसळधार पाऊस होईल अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, यावेळी सगळ्यात जास्त पावसाचा तडाखा हा विदर्भाला बसणार आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किलोमीटर असेल. यावेळी मेघगर्जना आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुणे आणि आसपासच्या परिसरात आज गारा पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची काळजी घ्यावी आणि योग्य ठिकाणी धान्याची विल्हेवाट लावावी अशा सूचना देण्यात आला आहेत.

महाराष्ट्रात ३ दिवस ऑरेंज अलर्ट | weather news

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज विदर्भातही धुवांधार पाऊस होण्याची शक्यता आहे. विदर्भासह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. अधिक माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पुढचे २ दिवस तर विदर्भामध्ये पुढचे ३ दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे सध्या कमाल तापमानात घट झाली असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

कुठल्या जिल्ह्यांना पावसाचा इशारा? | openweathermap

राज्यात मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, उस्मानाबाद, बीड, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर जळगावमध्ये तुफान पाऊस झाला असून पुढचे काही दिवसही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रात जळगाव, नाशिक, नंदूरबार, अहमदनगर आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला असून पुढचे २४ तास या जिल्ह्यांसाठी महत्त्वाचे असणार आहेत.

का सुरू आहे अवकाळी पाऊस?

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण अरबी समुद्रामध्ये मालदीव बेटांजवळ समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. याचा परिणाम संपूर्ण देशभर पाहायला मिळत आहेत. यामुळे महाराष्ट्रातील विदर्भापासून ते तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. म्हणून राज्यात मे महिन्यातही अवकाळीचा तडाखा पाहायला मिळेल.

आजचा हवामानाचा अंदाज

नावहवामान अंदाज महाराष्ट्र राज्य
विभागभारतीय हवामान शास्त्र विभाग
पत्ताहवामान विभाग – IMD
दिनांक05 मे 2023
संकलनआजचे हवामान महाराष्ट्र 2023

पंजाब डख हवामान अंदाज Whatsapp Group

मित्रांनो दररोज जिल्हानिहाय हवामान अंदाज मिळवण्यासाठी आणि त्याचबरोबर पंजाब डख हवामान अंदाज व हवामान विभागाचे अपडेट निशुल्क मिळवण्यासाठी इथे क्लिक करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा आणि हि माहिती जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn
Follow us

---Advertisement---

LATEST Post

Close Visit Havaman Andaj

WhatsApp Icon Telegram Icon