Monsoon Update: कोकण, मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भात जोरदार पाऊस जोर धरणार; मराठवाड्यात हलक्या सरीची शक्यता 

Maharashtra Rain Update: मॉन्सून वाऱ्यांनी रविवारी म्हणजेच २९ जून रोजी संपूर्ण देश व्यापला आहे. राज्याच्या विविध भागात पाऊस हजेरी लावत आहे. परंतु अद्यापही बहुतांश जिल्ह्यातील विविध भागात जोरदार पावसाची प्रतिक्षा कायम आहे.

मॉन्सून वाऱ्यांनी रविवारी म्हणजेच २९ जून रोजी संपूर्ण देश व्यापला आहे. राज्याच्या विविध भागात पाऊस हजेरी लावत आहे. परंतु अद्यापही बहुतांश जिल्ह्यातील विविध भागात जोरदार पावसाची प्रतिक्षा कायम आहे. हवामानशास्त्र विभागाने सोमवारपासून कोकण, मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली आहे.

आज कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक दोन ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर पुणे, कोल्हापूर आणि सातारा घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील जळगाव अहिल्यानगरसह मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पावसाच्या सरी हजेरी लावण्याची शक्यता आहे.

तर भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.मंगळवारपासून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मॉन्सून सक्रिय होण्यास अनुकूल स्थिती असल्याने देशाच्या वायव्य, मध्य आणि पूर्व भागात पुढील ६ ते ७ दिवस पावसाला पोषक हवामान राहील.

त्यामुळे कोकण, घाटमाथ्यासह मध्य महाराष्ट्रात जोरदार ते अति जोरदार पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. बुधवारी कोकण, पूर्व विदर्भ आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे. राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याने तापमानाचा पारा वाढला आहे.

त्यामुळे उकाडा जाणवू लागला आहे. मागील चोवीस तासात जेऊर येथे राज्यातील उच्चांकी ३३.५ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. तर बहुतांश भागात कमाल तापमानाचा पारा तिशीपार होता. पावसाचा जोर कमी झाल्या पेरणीला गती आली आहे. परंतु पेरणी झालेल्या ठिकाणी शेतकऱ्यांना पावसाची प्रतिक्षा आहे. 

Close Visit Havaman Andaj

Scroll to Top