पंजाब डख हवामान अंदाज । राज्यात सध्या परतीचा पाऊस (Rain) चांगलाच धुमाकूळ घालत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात परतीच्या पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने (IMD) आज देखील राज्यात परतीचा पाऊस (Monsoon) बरसणार असल्याचे स्पष्ट केले आहे. हवामान विभागाच्या मते आज राज्यातील विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात विजांच्या कडकडाटासह पावसाची (Monsoon News) शक्यता आहे.
हवामान विभागाचा “या जिल्ह्यांना” येलो अलर्ट
या अनुषंगाने भारतीय हवामान विभागाने काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देखील जारी केला आहे. आज कोकणातील पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना भारतीय हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच आज मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यात पावसाची शक्यता लक्षात घेता भारतीय हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
विदर्भ – मराठवाडा हवामान अंदाज
याशिवाय आज मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर या जिल्ह्यात देखील पावसाची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. तसेच आज विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट भारतीय हवामान विभागाने जारी केला आहे.
पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज
दरम्यान पंजाबराव डख यांचादेखील हवामान अंदाज समोर आला आहे. पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या आपल्या नवीन अंदाज हवामान अंदाजानुसार (Panjabrao Dakh Havaman Andaj), आजपासून राज्यात 15 ऑक्टोबर पर्यंत पावसाची शक्यता आहे. खरं पाहता 13 ऑक्टोबर पर्यंत राज्यात हलका ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस कोसळणार आहे. त्यानंतर राज्यात पावसाचा जोर कमी होणार आहे.
पंजाबरावांनी दिला “या जिल्ह्यांना” इशारा
ऑक्टोबरपर्यंत राज्यातील मुंबई, नाशिक, विदर्भ, मराठवाडा सातारा सांगली कोल्हापूर अहमदनगर दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र नाशिक या भागात हलका ते जोरदार स्वरूपाचा पाऊस कोसळणार असल्याचे पंजाबराव डख (Panjabrao Dakh News) यांनी स्पष्ट केले आहे. या कालावधीत काही ठिकाणी रिमझिम पाऊस कोसळेल तर काही ठिकाणी मात्र अति मुसळधार पाऊस कोसळणार आहे.
शेतकऱ्यांना आवाहन 🙏
यामुळे बांधवांनी आपल्या शेतमालाची विशेष काळजी घ्यावी. सध्या राज्यातील शेतकरी बांधव खरीप हंगामातील पिकांची काढणी करत आहेत. अशा परिस्थितीत खरीप हंगामातील पिकांची शेती जसे की, मका सोयाबीन गहू या पिकांची काढणी झाल्यानंतर शेतकरी बांधवांनी लगेचच शेतीमाल सुरक्षित ठिकाणी हलवुन घ्यावा.
तुमच्या जिल्ह्याचा हवामान अंदाज पहा
- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पंजाबराव डख यांचा २१ जून २०२५ पर्यंतचा हवामान अंदाज; ‘या’ जिल्ह्यांत जोरदार पाऊस | Punjab Dakh Havaman Andaj
- आजचे हवामान | या २२ जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात मुसळधार पाऊस
- महाराष्ट्रात मान्सूनने जोर धरला, अनेक भागांत ढगफुटीसदृश्य पाऊस, 2 जिल्ह्यांना रेड अलर्ट | Monsoon 2025
- Monsoon Update: मे महिन्यात कसे असेल हवामान, कुठे आहे पावसाची शक्यता? पहा हवामान विभागाचा अंदाज
- पुढील 4 दिवस या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा 🌦️ 29 एप्रिल ते 2 मे हवामान अंदाज | Monsoon 2025
- Weather Update: महाराष्ट्रात पाऊस कधी व कुठे होणार? जाणून घ्या सविस्तर हवामान अंदाज!
नाव | पंजाब डख (Panjab Dakh Patil Weather Forecast) |
---|---|
विभाग | पंजाबराव डख पाटील हवामान अंदाज |
गाव | मु.पो. गुगळी धामणगाव, ता.सेलू जि .परभणी 431503 |
दिनांक | 08 ऑक्टोबर 2022 |
फेसबुक | दररोज हवामान अंदाजासाठी फेसबुक पेज लाईक करा |
हवामान अंदाज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा | |
संकलन | आजचे हवामान महाराष्ट्र 2022 |
पंजाब डख हवामान अंदाज WhatsApp Group
शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अभ्यासक Panjabrao Dakh Patil Weather Forecast यांचा अंदाज मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटचे नोटिफिकेशन सुरू करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद