Unseasonal Rain Update : राज्यात दोन दिवस ‘येलो अलर्ट’, हवामान विभागाचा इशारा!

Unseasonal Rain Update : राज्यात अवकाळी पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही आहे. हवामान विभागाने पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिला आहे. राज्यात दोन दिवस येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. तर परभणी,लातून, हींगोलीला ऑरेंज अलर्ज जारी करण्यात आला आहे.

राज्‍यात अवकाळी पावसाचा धडाका सुरू आहे. तर गेल्या अनेक दिवसांपासून तापमानाच्या पारा देखील ४० अंश सेल्‍सीअसपेक्षा अधिक आहे. मात्र सायंकाळी ५ ते ६ वाजेच्या सुमारास पावसाला सुरूवात होते. काल (गुरुवार) राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडला.

काल पुण्यात देखील अनेक भागात पाऊस पडला. सोसाट्याच्या वाऱ्यासह गुरुवारी (ता. ४) सायंकाळी पाचच्या सुमारास पाऊण तास धो-धो बरसला. पावसामुळे भूमकर चौकातील भुयारी पुलात तब्बल गुडघाभर पाणी साचले होते. त्यामुळे वाहनांच्या लांब रांगा लागल्याने आयटीयन्ससह स्थानिक रहिवाशांना मोठ्या मनःस्थापाला सामोरे जावे लागले. अनेक वाहने या पाण्यात बंद पडली होती.

घोटीसह परिसरात जोरदार पावसाने हजेरी –

प्रचंड उकाडा व नंतर काळे ढग भरून आल्याने दुपार नंतर पावसाने सुमारे एक तास हजेरी लावल्याने गटारी तुडुंब भरून मुख्य मार्गांवर पाणी साठल्याचे जागोजागी दिसून आले. अचानकपणे पावसाने लावलेली हजेरीमुळे बाजारात दाखल शेतकरी बांधवांची देखील हाल झाल्याचे पाहायला मिळाले.

आजचा हवामानाचा अंदाज

नावहवामान अंदाज महाराष्ट्र राज्य
विभागभारतीय हवामान शास्त्र विभाग
पत्ताहवामान विभाग – IMD
दिनांक05 मे 2023
संकलनआजचे हवामान महाराष्ट्र 2023

पंजाब डख हवामान अंदाज Whatsapp Group

मित्रांनो दररोज जिल्हानिहाय हवामान अंदाज मिळवण्यासाठी आणि त्याचबरोबर पंजाब डख हवामान अंदाज व हवामान विभागाचे अपडेट निशुल्क मिळवण्यासाठी

Close Visit Havaman Andaj

Scroll to Top