Weather Update: शेतकऱ्यांनो, पेरणी करताय तर थांबा; हवामान खात्याने दिला महत्त्वाचा इशारा

हवामान अंदाज महाराष्ट्र 2022: राज्यात एकीकडे राजकीय खळबळ सुरू असताना दुसरीकडे सर्वसामान्यांना मात्र पावसाची प्रतिक्षा आहे. अशात शेतकऱ्यांसाठी हवामान (Weather Update) खात्याकडून महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पश्चिम विदर्भात पाऊस विखुरलेल्या स्वरूपात राहणार असल्याने शेतकऱ्यांनी जिथे ओल कमी आहे अशा भागात सोयाबीनची पेरणी दोन तीन दिवस पुढे ढकलणे आवश्यक आहे.

आजचा हवामान अंदाज

कपाशीची पेरणी ४” ओल असल्यास आपल्या भागातील पावसाचा अंदाज घेऊन करता येईल. आज अमरावती अकोला बुलढाणा विखुरलेल्या स्वरूपात (scattered) काही ठिकाणी पावसाची शक्यता. उर्वरित विदर्भात बरेच ठिकाणी गडगडटासह पाऊस आहे. तर २४ जून रोजी संपूर्ण विदर्भात अनेक भागांत गडगडटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

लाईव्ह हवामान अंदाज

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, २५ जूनला अमरावती, अकोला, बुलढाणा, गोंदिया, भंडारा या भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे तर उर्वरित विदर्भात गडगडटासह पाऊस होईल. २६, २७ जूनला अमरावती, अकोला, बुलढाण्यात विखुरलेल्या स्वरूपात पावसाच शक्यता वर्तवण्यात आली आहे. २७ जुननंतर विदर्भात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याची माहिती. प्रा. अनिल बंड यानी वर्तविली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज घेत पेरणीच्या कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हवामान अंदाज विदर्भ live

तर शेतकरी मित्रांनो पुढील पाच दिवसांमध्ये अशा प्रकारचा वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. तुमचा जिल्हा कोणता आहे आम्हाला कमेंट शिक्षण मध्ये अवश्य सांगा आणि हवामान अंदाज बातमी आवडल्यास इतर शेतकऱ्यांना सुद्धा शेअर करायला विसरू नका.

इतर हवामानाच्या बातम्या –

नावहवामान अंदाज महाराष्ट्र राज्य
विभागभारतीय हवामान शास्त्र विभाग
पत्ताहवामान विभाग – IMD
दिनांक23 जून 2022
संकलनआजचे हवामान महाराष्ट्र 2022

पंजाब डख हवामान अंदाज Whatsapp Group

मित्रांनो दररोज जिल्हानिहाय हवामान अंदाज मिळवण्यासाठी आणि त्याचबरोबर पंजाब डख हवामान अंदाज व हवामान विभागाचे अपडेट निशुल्क मिळवण्यासाठी इथे क्लिक करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा आणि हि माहिती जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद

Close Visit Havaman Andaj

Scroll to Top