आजचे हवामान अंदाज महाराष्ट्र live: राज्यातील काही भागांत आज 13 सप्टेंबरला मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच कोकणातील रायगड, पालघर, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
भारतीय हवामान विभागाचे उप महासंचालक (पश्चिम विभाग) कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विटरवरुन दिलेल्या माहितीनुसार..
13 सप्टेंबर रोजी पहाटे सहा वाजता टीपण्यात आलेल्या सॅटेलाइट इमेजनुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र पुढच्या दोन दिवसांत उत्तर-पश्चिम भागात सरकण्याची शक्यता आहे. मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र, कोकणात अधिक सरी बरसण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. 13 सप्टेंबरला कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची दाट शक्यता आहे. मराठवाडय़ात तुरळक ठिकाणी ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार आहे.

रविवारी किती पाऊस झाला?
रविवारी कोकण विभागात अनेक ठिकाणी पाऊस झाला. मुंबई, रत्नागिरीतही हलक्या ते मध्यम पावसाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्रामधील पुणे, कोल्हापूर, महाबळेश्वर, नाशिक भागांत पावसाची नोंद झाली. मराठवाड्यातील औरंगाबाद, विदर्भातील अमरावती, चंद्रपूर, नागपूर, वर्धा आदी भागांत हलका पाऊस झाला. मागील गेल्या 24 तासांत माथेरान, महाबळेश्वर, लोणावळा, ताम्हिणी इ. घाटमाथ्यावरील भागांत 100 ते 170 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
‘या’ धरणांतून विसर्ग सुरू..
कोयना धरणाखालील कृष्णा, कोयना नद्यांकाठीही सर्वत्र संततधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. कोयना धरणाचे दरवाजे 2.6 फुटांपर्यंत उघडण्यात आले आहे. या विसर्गामुळे पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने कोयना काठच्या गावांना सतर्कचे इशारा देण्यात आलाय.
हे पण वाचा:
- Maharashtra Rain Updates : आजपासून तुफान पाऊस!! या जिल्ह्यांतील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा
- Maharashtra Weather : पुणेसह राज्यातील ‘या’ 16 जिल्ह्यांना येलो अलर्ट! जाणून घ्या आज कुठे पाऊस पडणार
- Panjabrao Dakh सांगतायत राज्यामध्ये आता मुसळधार पाऊस केव्हा आणि कोणत्या जिल्ह्यात होणार? पहा पंजाब डख हवामान अंदाज
- Monsoon Rain Forecast: राज्यात काही ठिकाणी मुसळधार, तर विदर्भात सोमवारपासून पावसाला विश्रांती मिळण्याची शक्यता
- Monsoon Update: कोकण, मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भात जोरदार पाऊस जोर धरणार; मराठवाड्यात हलक्या सरीची शक्यता
पुणे पसिरसातील खडकवासला धरण 97 टक्के भरलं आहे. खडकवासलामधून 6 हजार 848 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात असल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. पानशेत, भाटघर आणि वरसगाव धरण 100 टक्के भरली असून टेमघर धरण 99 टक्के भरलं आहे.
नाशिक जिल्ह्यामधील नांदूर मध्यमेश्वर धरणातून सर्वाधिक म्हणजेच 13 हजार क्युसेक, गंगापूर धरणातून 1 हजार 500 क्युसेक, दारणा धरणातून 12 हजार क्युसेक, कडवा धरणामधून 2 हजार 200 क्युसेक, आळंदी धरणातून 30 क्युसेक तर वालदेवी धरणातून 130 क्युसेक पाणी सोडलं आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणही 100% भरलं आहे. रविवारी धरणामधून साडेतीन हजार क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आले होते, आता आज सोमवारी पहाटे भंडारदरा धरणातून प्रवरा नदी पात्रात 7744 क्युसेक्सपर्यंत हा विसर्ग वाढविण्यात आला आहे. सध्या निळवंडे धरणात सध्या 86 टक्के साठा असून दोन दिवसांत हेही धरण भरण्याची शक्यता आहे.
आता ‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता..
आजपासून कोकण विभागात आणखी तीन, तर मध्य महाराष्ट्रात दोन दिवस काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. मराठवाडा, विदर्भात दोन दिवस बहुतांश ठिकाणी पाऊस असणार आहे.
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत 14 ते 15 सप्टेंबरपर्यंत काही भागांत मुसळधार पाऊस असेल पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांतील घाट विभागांत 14 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. नंदुरबार, नाशिक, जळगाव जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. 13 सप्टेंबरला जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. या दिवशी विदर्भात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस असू शकतो, असा अंदाज आहे.