गुलाब चक्रीवादळ: बंगालच्या उपसागरात घोंगावणारे ‘गुलाब’ चक्रीवादळ (Gulab Chakri Vadal) रविवारी (ता. २६) सायंकाळी सहा वाजण्याचा सुमारास आंध्रप्रदेश आणि ओडिशाच्या किनाऱ्यावर असलेल्या कलिंगापट्टणम पासून उत्तरेकडे २५ किलोमीटर अंतरावर धडकले.
पुणे : बंगालच्या उपसागरात घोंगावणारे ‘गुलाब’ चक्रीवादळ रविवारी (ता. २६) सायंकाळी सहा वाजण्याचा सुमारास आंध्रप्रदेश आणि ओडिशाच्या किनाऱ्यावर असलेल्या कलिंगापट्टणम पासून उत्तरेकडे २५ किलोमीटर अंतरावर धडकले. आज (ता. २७) ही वादळी प्रणाली महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भात येण्याचे संकेत आहेत.
Gulab Cyclone Update

राज्यात २ दिवस मुसळधार पावसाचा इशारा
बंगालच्या उपसागरात शुक्रवारी (ता. २४) तयार झालेल्या कमी दाबाचे क्षेत्राची तीव्रता वाढल्याने शनिवारी (ता. २५) रात्री ‘गुलाब’ चक्रीवादळाची निर्मिती झाली. पूर्व किनाऱ्याकडे वेगाने झेपावणारे चक्रीवादळ ओडिशाच्या गोपाळपूर, आंध्रप्रदेशच्या कलिंगापट्टणम दरम्यान धडकली. ही प्रणाली जमिनीवर येण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
K.S. Hosalikar Weather Forecast on Gulab Cyclone
त्यामुळे पूर्व किनाऱ्यालगतच्या असलेल्या समुद्रात उंच लाटा उसळण्यास सुरवात झाली. तसेच जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरवात झाली आहे. चक्रीवादळामुळे पूर्व किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता असल्याने आंध्र प्रदेश, ओडिशा, तेलंगणामध्ये स्थानिक प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे.
हे पण वाचा:
- Monsoon Update: मे महिन्यात कसे असेल हवामान, कुठे आहे पावसाची शक्यता? पहा हवामान विभागाचा अंदाज
- पुढील 4 दिवस या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा 🌦️ 29 एप्रिल ते 2 मे हवामान अंदाज | Monsoon 2025
- Weather Update: महाराष्ट्रात पाऊस कधी व कुठे होणार? जाणून घ्या सविस्तर हवामान अंदाज!
- आजचे हवामान दि.२३ एप्रिल २०२४ : राज्यात वाढला तापमानाचा पारा, पुढचे 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा
- राज्यात सूर्य तापला, या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी, पहा आजचे हवामान कसे असेल | Havaman Andaj Today
महाराष्ट्रात दोन दिवस जाणवणार प्रभाव
जमिनीवर आल्यानंतर वादळाची तीव्रता ओसरणार असून, आज (ता. २७) ही प्रणाली विदर्भापर्यंत पोचण्याचे संकेत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात दोन दिवस प्रभाव जाणवणार आहे, या काळात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. यात सोमवारी (ता. २७) विदर्भ, मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्रात, तसेच मंगळवारी (ता. २८) कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Source -Agrowon
नाव | भारतीय हवामान विभाग महाराष्ट्र राज्य यांचा अंदाज |
---|---|
विभाग | प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई |
पत्ता | IMD Mumbai व IMD New Delhi |
दिनांक | 26 सप्टेंबर 2021 |
संकलन | आजचे हवामान महाराष्ट्र 2021 |
मित्रांनो दररोज जिल्हानिहाय हवामान अंदाज मिळवण्यासाठी आणि त्याचबरोबर पंजाब डख यांचे अपडेट व हवामान विभागाचे अपडेट निशुल्क मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा आणि हि माहिती जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.