Weather Forecast Today: नोव्हेंबर महिन्यात देशात अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं जोरदार तडाखा दिला आहे. यानंतर आता पुन्हा एकदा दक्षिण भारतात पावसासाठी पोषक हवामान तयार होतं आहे.
पुणे, 13 डिसेंबर: मागील दोन आठवड्यांपासून महाराष्ट्रासह देशात पावसानं (Rainfall in maharashtra) उसंत घेतली आहे. नोव्हेंबर महिन्यात देशात अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं जोरदार तडाखा दिला आहे. यानंतर आता पुन्हा एकदा दक्षिण भारतात पावसासाठी पोषक हवामान तयार होतं आहे. पुढील तीन ते चार दिवसात दक्षिण भारतात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची (Light rain) शक्यता हवामान खात्याकडून (IMD) वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतीतील नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेण्याचा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.
हवामान खात्याने तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश आणि दक्षिण कर्नाटकातील काही भागात पुढील तीन ते चार दिवसात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेली दोन आठवडे पावसानं उसंत घेतल्यानंतर, दक्षिण भारतात पुन्हा एकदा पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या जवाद चक्रीवादळामुळे पूर्वी किनारपट्टी परिसरात अनेक ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली होती.
दुसरीकडे, महाराष्ट्रात मात्र पुढील पाचही दिवस कोरड्या हवामानाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दक्षिण कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये आज ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. पण याठिकाणी पावसाची शक्यता खूपच कमी आहे. पुढील दोन ते तीन दिवसात सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
हेही वाचा –
- Maharashtra Rain Updates : आजपासून तुफान पाऊस!! या जिल्ह्यांतील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा
- Maharashtra Weather : पुणेसह राज्यातील ‘या’ 16 जिल्ह्यांना येलो अलर्ट! जाणून घ्या आज कुठे पाऊस पडणार
- Panjabrao Dakh सांगतायत राज्यामध्ये आता मुसळधार पाऊस केव्हा आणि कोणत्या जिल्ह्यात होणार? पहा पंजाब डख हवामान अंदाज
- Monsoon Rain Forecast: राज्यात काही ठिकाणी मुसळधार, तर विदर्भात सोमवारपासून पावसाला विश्रांती मिळण्याची शक्यता
- Monsoon Update: कोकण, मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भात जोरदार पाऊस जोर धरणार; मराठवाड्यात हलक्या सरीची शक्यता
एकंदरीत देशात सर्वत्र कोरडं हवामान राहणार असल्याने हिमालयातील वाऱ्यांची गती देखील मंदावली आहे. त्यामुळे राज्यात थंडीसाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. दुसरीकडे पुण्यातील शिरूर याठिकाणी किमान तापमानाचा पारा 12.4 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. त्यापाठोपाठ हवेली आणि माळीण याठिकाणी अनुक्रमे 13.3 आणि 13.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.