Monsoon Update 2024 | महाराष्ट्रात मान्सून कधी धडकणार? आनंदाची बातमी, मान्सून आला रे आला…अंदमानमध्ये दाखल

Monsoon 2024 in Maharashtra Latest News: महाराष्ट्रातील सर्व नागरिक सध्या उकाड्याने प्रचंड त्रस्त आहेत. खासकरुन मुंबई, पुणे सारख्या शहरांमध्ये तर उन्हाच्या झळा असह्य झाल्या आहेत. त्यामुळे कधी एकदा उन्हाळा संपतो आणि पावसाळा सुरु होतो याची सर्वजण वाट पाहत आहेत. यादरम्यान आता सर्वांनाच प्रतिक्षा असलेल्या मान्सूनचं काल (२० मे २०२४) अंदमानात आगमन झालं आहे. हवामान विभागाने (Weather Department) सर्वाना आनंदाची बातमी दिली आहे. 31 मे रोजी मान्सून केरळच्या (Kerala) किनारपट्टीवर आणि 11 जूनला महाराष्ट्रात दाखल होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. 

अंदमान-निकोबार, मालदीव आणि कोमोरीन भागात मान्सूनचं आगमन झालं आहे. हवामान विभागानं याबात माहिती दिली असून, यानुसार 31 मे रोजी मान्सून केरळच्या किनारपट्टीवर दाखल होईल. तर महाराष्ट्रात मान्सून 11 जूनला दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसंच यावर्षी पाऊस जवळपास 106 टक्के होण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. 

हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला

मे महिना सुरु झाला म्हणजे नैऋत्य मान्सूनची वाट सर्व जण पाहतात. यंदा मान्सून अंदमान निकोबार बेटांमध्ये वेळेआधी येणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले होते. आयएमडीने १९ मे ही तारीख अंदमानमधील मान्सूनच्या आगमानाची दिली गेली होती. त्यानुसार अंदमान, मालदीव, कोमोरिनच्या काही भागात दाखल झाला आहे.

बंगालच्या उपसागराच्या काही भागात मान्सून पोहचला आहे. मान्सून दाखल झाल्यामुळे अंदमानमध्ये पाऊस सुरु झाला आहे. यासंदर्भात ट्विट पुणे हवामान विभागाचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी केले आहे. दरवर्षी अंदमानमध्ये २२ मे पर्यंत मान्सून दाखल होतो. यंदा तीन दिवस आधीच आला आहे.

केरळमध्ये दहा दिवसांत पोहचणार

मान्सून अंदमान निकोबारमध्ये दाखल झाल्यानंतर आता त्याची वाटचाल केरळकडे सुरु होणार आहे. अंदमानमधून नैऋत्य मोसमी वाऱ्यांना केरळपर्यंत पोहचण्यासाठी दहा दिवस लागतात. मान्सूनची वाटचाल अशीच राहिली तर ३१ मे पर्यंत केरळमध्ये दाखल होणार आहे.

मान्सूनपूर्व पाऊस केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल या भागात होणार आहे. 19 आणि 20 मे रोजी या राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. त्यामुळे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. नैऋत्य मान्सून ३१ मे रोजी केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. 22 मे रोजी केरळमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. 21 मे 2024 रोजी 204.5 मिमी पेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. मेघालयात 19 आणि 20 मे रोजी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

monsoon 2024 update andaman enttry
Monsoon Update 2024 | महाराष्ट्रात मान्सून कधी धडकणार? आनंदाची बातमी, मान्सून आला रे आला…अंदमानमध्ये दाखल 2

विदर्भालाही इशारा

गेल्या आठवड्याभरापासून राज्यासह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना अवकाळी पावसाने फटका बसल्याचं दिसून आलंय. अशातच हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढचे पाच दिवस विदर्भातील सर्व जिल्ह्यांना अवकाळी पाऊस, विजांच्या कडकडासह  30-40 किमी प्रति तास सोसाट्याच्या वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आलाय. 

राज्यातील या जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार विदर्भात आज पासून पुढचे पाच दिवस पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय. नागपूर, वर्धा, वाशिम, बुलढाणा वगळता उर्वरित सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अमरावती, अकोला, यवतमाळ, चंद्रपुर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडासह वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आलाय. तर 19 मे ते 22 मे पर्यंत विदर्भातील सर्व जिल्ह्यांना नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. 

नावभारतीय हवामान विभाग यांचा अंदाज
विभागप्रादेशिक हवामान केंद्र मुंबई
पत्ताIMD Mumbai व IMD New Delhi
दिनांक21 मे 2024
फेसबुकदररोज हवामान अंदाजासाठी फेसबुक पेज लाईक करा
WhatsAppहवामान अंदाज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
संकलनआजचे हवामान महाराष्ट्र 2024

शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अंदाज मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद!

Close Visit Havaman Andaj

Scroll to Top