हवामान अभ्यासक पंजाबराव डख (PunjabRao Dakh) यांनी महाराष्ट्रात यावर्षी कधी पाऊस येईल? यावर्षीचा पावसाळा कसा असेल? याबाबतची माहिती सांगितली आहे.
Maharashtra Monsoon News : सध्या राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Chnage) होत असल्याचं चित्र दिसत आहे. कुठे उन्हाचा तडाखा जाणवत आहे, तर कुठं अवकाळी पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. यावर्षी देशात चांगला पाऊस (Rain) पडण्याचा अंदाज हवामान विभागानं (IMD) वर्तवलाय. दरम्यान, हवामान अभ्यासक पंजाबराव डख (PunjabRao Dakh) यांनी महाराष्ट्रात यावर्षी कधी पाऊस येईल? यावर्षीचा पावसाळा कसा असेल? याबाबतची माहिती सांगितली आहे.
9 ते 16 जूनच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये मान्सूनचे आगमन
सध्या अंदमान निकोबारमध्ये मान्सूनची एन्ट्री झाली आहे. 31 मे पर्यंत हा मान्सून केरळमध्ये दाखल होईल अशी माहिती पंजाबराव डखांनी दिलीय. यावर्षी केरळमधील मान्सूनचे आगमन हे तारखेपूर्वीच म्हणजेच एक जून अगोदरच होईल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. परंतू, यामध्ये चार दिवस कमी जास्त होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. त्यानुसार 28 मे ते 3 जून दरम्यान कधीही मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. तसेच भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार 9 ते 16 जूनच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये मान्सूनचे आगमन होईल.
यावर्षी कसा असेल पाऊस?
मागील वर्षी राज्यात पावसाचे प्रमाण अल्प राहीले. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळं यावर्षी नेमका कसा पाऊस राहील? असा सवाल उपस्थित केला जातोय. गेल्या वर्षी आपल्याला माहित आहे की एल निनो सक्रिय झालेला होता. त्यामुळं संपूर्ण भारतामध्ये खूप कमी प्रमाणात पाऊस झाला होता. परंतू, यावर्षी एल निनोची स्थिती या आठवड्यामध्ये संपुष्टात आली आहे. येणाऱ्या तीन ते पाच आठवड्यामध्ये ला नीनाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये यावर्षी चांगला पाऊस अपेक्षित आहे.
दुपारपर्यंत तापमानात वाढ, दुपारनंतर वादळाची स्थिती
हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार मध्य महाराष्ट्रासह पुणे जिल्ह्यात चक्रीवादळाच्या अभिसरणाची स्थिती निर्माण झालीय. दुपारपर्यंत तापमानात वाढ जाणवेल, असंही सांगण्यात आलंय. या स्थितीमुळं वातावरणातील आर्द्रता वाढू शकते. वातावरणातील या बदलांमुळं शहरातील काही भागात वादळी वाऱ्यासह, विजांच्या कडकडाटात पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. अशातच भारतीय हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांच्या वतीनं नैऋत्य मोसमी वाऱ्याचं आगमन दक्षिण निकोबार बेटावर आणि दक्षिण अंदमान सागरात झाल्याच सांगितलं. याशिवाय मान्सून मालदीव, कोमोरिन भाग, आणि बंगालच्या खाडीच्या दक्षिणेकडील भागात झाल्याचं सांगितलं.
महत्वाच्या बातम्या:
- Panjabrao Dakh सांगतायत राज्यामध्ये आता मुसळधार पाऊस केव्हा आणि कोणत्या जिल्ह्यात होणार? पहा पंजाब डख हवामान अंदाज
- Monsoon Rain Forecast: राज्यात काही ठिकाणी मुसळधार, तर विदर्भात सोमवारपासून पावसाला विश्रांती मिळण्याची शक्यता
- Monsoon Update: कोकण, मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भात जोरदार पाऊस जोर धरणार; मराठवाड्यात हलक्या सरीची शक्यता
- Monsoon Breaking News: राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, पाहा आजपासून पुढील ४ दिवसांचा हवामान अंदाज
- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पंजाबराव डख यांचा २१ जून २०२५ पर्यंतचा हवामान अंदाज; ‘या’ जिल्ह्यांत जोरदार पाऊस | Punjab Dakh Havaman Andaj