Monsoon Update : ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी, तुमच्या जिल्ह्यात कधी पडणार पाऊस? वाचा.. । Weather

देशातील गुजरातपासून महाराष्ट्राच्या किनारपट्टीपर्यंत आणि पूर्व राजस्थान ते मध्य प्रदेशपर्यंतच्या भागात दोन कमी दाबाचे पट्टे तयार झाल्याचं समजतंय. याचा परिणाम कोकणासोबतच कोल्हापूर व सातारा या भागात अतिमुसळधार (रेड अलर्ट) पाऊस तर मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात 6 ते 8 जुलै दरम्यान मुसळधार पाऊस बरसणार (Rain Update) असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

पुणे जिल्ह्यात 6 ते 9 जुलै या 4 दिवसांत कधीही मुसळधार पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मागील 3-4 दिवसांपासून कोकणात अतिमुसळधार पाऊस पडत आहे आणि तेथील नद्यांमुळे आसपासच्या परिसरात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

गावागावांत पुराचे पाणी शिरल्याचं पाहायला मिळत आहे. मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा आणि विदर्भातही अतिवृष्टी झाली आहे, तर मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात त्या तुलनेत सध्या पाऊस कमी प्रमाणात बरसत आहे.

कुठे पाऊस, कुठे कोणते अलर्ट..?

रेड अलर्ट (अतिवृष्टी): 100 ते 200 मि.मी.पेक्षा जास्त पाऊस, पूरस्थितीचा धोका – रत्नागिरी (6 ते 8 जुलै), कोल्हापूर (6 ते 8 जुलै), सातारा (6 ते 8 जुलै), पालघर (8 जुलै), रायगड (6 ते 8 जुलै)

ऑरेंज अलर्ट : (मुसळधार): 60 ते 99 मि.मी. पाऊस. घरात, रस्त्यांवर पाणी तुंबण्याचा धोका – नाशिक (6 ते 9 जुलै), पुणे (6 ते 9 जुलै), कोल्हापूर (9 जुलै), सातारा (9 जुलै), पालघर (6 ते 9 जुलै), ठाणे (6 ते 9 जुलै), मुंबई (6 ते 9 जुलै), रायगड (9 जुलै), सिंधुदुर्ग (6 ते 9 जुलै)

यलो अलर्ट : (साधारण पाऊस) : 19 ते 59 मि.मी. पाऊस – नगर (8 जुलै), औरंगाबाद (6 व 7 जुलै), धुळे (8 जुलै), नंदुरबार (6 ते 9 जुलै), जळगाव (8 जुलै), जालना (6 व 7 जुलै), परभणी (6 व 7 जुलै), हिंगोली (6 व 7 जुलै), नांदेड (6 व 7 जुलै).

कोकणात मागील 24 तासांतील पाऊस (मिमीमध्ये)

कोकण- लांजा -340, मालवण-230, संगमेश्वर-210, मंडणगड-210, महाड-190, सावंतवाडी-190, वेगुर्ला- 210, पेण -170, वसई-110, कर्जत -100, माणगाव- 230, वैभववाडी-230, कल्याण-190, अंबरनाथ-190, डहाणू -150, कणकवली-110, पालघर-190, उल्हासनगर-180, पनवेल -170, माथेरान-120, रत्नागिरे-120, तलासरी -130, मुंबई-120, चिपळूण-170, पोलादपूर-170, ठाणे-170

आजचा हवामानाचा अंदाज

नावहवामान अंदाज महाराष्ट्र राज्य
विभागभारतीय हवामान शास्त्र विभाग
पत्ताहवामान विभाग – IMD
दिनांक7 जुलै 2022
संकलनआजचे हवामान महाराष्ट्र 2022

पंजाब डख हवामान अंदाज Whatsapp Group

मित्रांनो दररोज जिल्हानिहाय हवामान अंदाज मिळवण्यासाठी आणि त्याचबरोबर पंजाब डख हवामान अंदाज व हवामान विभागाचे अपडेट निशुल्क मिळवण्यासाठी इथे क्लिक करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा आणि हि माहिती जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद

Close Visit Havaman Andaj

Scroll to Top