Weather Alert: पुढील 4 दिवसात राज्यात पुन्हा अतिमूसळधार पाऊस झोडपणार⛈️या जिल्ह्यांना इशारा

शेतकरी मित्रांनो आता आपण पाहुयात दिनांक 17 ऑक्टोबर 2019 चा हवामान अंदाज. ऑक्टोबरला राज्यातील बहुतांश भागांमध्ये आपल्याला ऊन आणि पावसाचा खेळ पाहायला मिळतोय विदर्भ मराठवाड्याच्या बऱ्याच भागात मुसळधार पाऊस हजेरी लावेल तर कोकण पश्‍चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच भागात पावसाची उघडीप राहील आता पाहूयात जिल्हानिहाय अंदाज.

17 ऑक्टोबर हवामान अंदाज विदर्भ

दिनांक 17 ऑक्टोबरला विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ व वाशीम इत्यादी जिल्ह्यात विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे

17 ऑक्टोबर हवामान अंदाज मराठवाडा

मराठवाड्यातील परभणी लातूर हिंगोली नांदेड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसासह विजांचा कडकडाट आणि मेघगर्जना आपल्याला 17 तारखेला पाहायला मिळेल. सोबतच जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे व औरंगाबाद बीड उस्मानाबाद इत्यादी जिल्ह्यांमध्ये मात्र पावसाची उघडीप राहील.

17 ऑक्टोबर हवामान अंदाज पुणे विभाग

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि नगर या सर्व जिल्ह्यांमध्ये पावसात उघडीप राहण्याचे संकेत दिनांक 17 ऑक्टोबरला निर्माण होत आहेत तुरळक ठिकाणी एक ते पाच मीटरपर्यंत च्या पावसाचा अंदाज राहील.

17 ऑक्टोबर हवामान अंदाज खानदेश

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक धुळे नंदुरबार आणि जळगाव हे चारही जिल्हे 17 तारखेला कोरडे राहण्याचा अंदाज आहे.

17 ऑक्टोबर हवामान अंदाज कोकण विभाग

तर दिनांक 17 ऑक्टोबरला कोकणातील पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई शहर व मुंबई उपनगर या सर्व भागांमध्ये आपल्याला पावसाची विश्रांती पाहायला मिळत आहे

16 ऑक्टोबर चा हवामान अंदाज पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

??३० सेकंदात लिंक येईल त्यावर क्लिक करा??

You have to wait 30 seconds.

??१६ ऑक्टोबर हवामान अंदाज साठी इथे क्लिक करा??

??१७ ऑक्टोबर हवामान अंदाज साठी इथे क्लिक करा??

??१८ ऑक्टोबर हवामान अंदाज साठी इथे क्लिक करा??

1 thought on “Weather Alert: पुढील 4 दिवसात राज्यात पुन्हा अतिमूसळधार पाऊस झोडपणार⛈️या जिल्ह्यांना इशारा”

Comments are closed.

Close Visit Havaman Andaj

Scroll to Top